बलात्कार्याला जामीन नाकारला

बेंगळुरू – कर्नाटक उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. हा निर्णय देतांना उच्च न्यायालयाने मनुस्मृति आणि म. गांधी यांचा उल्लेख करत स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. हे प्रकरण बिहारमधील बांका येथील १९ वर्षीय आदिवासी युवतीच्या बलात्काराशी संबंधित आहे.

या वेळी खंडिपिठाने मनुस्मृतीतील,
‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।। – मनुस्मृति (अध्याय ३, श्लोक ५६)
(आशय : जिथे स्त्रियांचा सन्मान होतो, तिथे देवता वास करतात आणि जिथे त्यांचा अपमान होतो, तिथे सर्व कर्मांचे महत्त्व अल्प होते.)
न्यायमूर्ती रचैया यांनी म. गांधी यांच्या ‘ज्या दिवशी स्त्रिया रात्री रस्त्यावर सुरक्षितपणे फिरू शकतील, त्या दिवशी आपण म्हणू शकतो की, भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे’, या वक्तव्याचीही आठवण करून दिली.
Karnataka HC cites Manusmriti to protect women’s dignity — denies bail to rapist.
A tight slap on Communists, Congress, Atheists & Progressives who falsely blame Manusmriti for crimes against women.
PC: @LawChakra pic.twitter.com/rorA4MwlQD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 29, 2025
काय आहे प्रकरण ?पीडित युवतीचे कुटुंबीय केरळमध्ये काम करतात. पीडित युवती २ एप्रिल या दिवशी तिच्या चुलत भावासह केरळहून बेंगळुरू येथील के.आर्. पुरम् रेल्वेस्थानकावर आली होती. दोघे बहीण-भाऊ महादेवपूरा परिसरात जेवणासाठी जात असता दोन व्यक्तींनी त्यांना पकडले. एका आरोपीने पीडितेच्या भावाला पकडले, तर दुसर्याने पीडित युवतीवर बलात्कार केला. पीडितेची आरडाओरड ऐकून आजूबाजूचे लोक साहाय्यासाठी धावले आणि दोन्ही आरोपींना पकडले. पोलिसांनी घटनास्थळी पोचून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला. |
संपादकीय भूमिकामहिलांवरील अत्याचारांना मनुस्मृतीतील शिकवण कारणीभूत असल्याचा धादांत खोटा आरोप करणारे साम्यवादी, काँग्रेसी, नास्तिकतावादी, पुरोगामी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाकडून सणसणीत चपराक ! |
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !