
१. साधना समजल्यावर त्वरित वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसाराची सेवा तळमळीने करणे
‘वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमेच्या प्रसाराच्या वेळी मुधोळ येथील धर्मप्रेमी श्री. केशव सार्वड हे आमच्या संपर्कात आले. त्यांना साधनेविषयी समजल्यावर त्यांनी अत्यंत सेवाभावाने गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा केली. त्यांना तीव्र शारीरिक त्रास असून व्यवस्थित बोलताही येत नाही, तरीही ते आमच्या समवेत प्रतिदिन गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी येत होते. त्यांनी गुरुपौर्णिमेची ४०० हून अधिक निमंत्रण पत्रके एकट्याने घराघरांत जाऊन दिली. ते अनेक धर्मप्रेमींना कार्यक्रमाला घेऊन आले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या जिज्ञासूंनी दिलेल्या अभिप्रायात ‘केशव यांच्यामुळे आम्ही येथे आलो’, असे लिहिले आहे.
२. ते प्रतिदिन मीठपाण्याचे उपाय (टीप) आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतात.
(टीप : मीठपाण्याचे उपाय म्हणजे साधारण अर्धा बालदीभर पाण्यात १ – २ मूठ खडे मीठ टाकून नंतर त्यात पाय बुडवून १० ते १५ मिनिटे नामजप करणे आणि नंतर ते पाणी प्रसाधनगृहात विसर्जित करणे.)
३. गुरुपौर्णिमेनंतर स्वतःहून विविध सेवांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणे
त्यांनी गुरुपौर्णिमेनंतर ‘आता मी कोणती सेवा करू?’, असे विचारले. त्यांनी २०० हून अधिक ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वितरण केले. आदर्श गणेशोत्सव अभियानाच्या अंतर्गत ते गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना भेटले. ते सात्त्विक उत्पादने आणि सनातनचे ग्रंथ खरेदी करून समाजात वितरित करत आहेत. ते ग्रंथप्रदर्शन सेवेत उत्साहाने सहभागी होतात. ते ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे नवीन वर्गणीदार बनवण्याची सेवा करतात.’
– सौ. सुजाता हुळीपल्लेद, बागलकोट, कर्नाटक. (२६.८.२०२५)
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !