जीवितहानी नाही !

बीजिंग (चीन) – चीनमध्ये हवेत उडणार्या चारचाकी वाहनांच्या चाचणीच्या वेळी २ वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. यात एक वाहन खोली कोसळून त्याला आग लागली, तर दुसरे सुखरूप खाली उतरले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चाचणी चालू असतांना या दोन्ही गाड्या एकमेकांच्या अतिशय जवळ आल्या आणि त्यांची धडक झाली. एका वाहनाचे मूल्य अडीच कोटी रुपये आहे. ‘XPeng AeroHT’ आस्थापनाच्या ‘eVTOL’ नावाच्या या चारचाकी गाड्या होत्या.
उडणार्या गाड्यांच्या इतिहासातील हा पहिला मोठा अपघात मानला जात आहे. यामुळे या तंत्रज्ञानाच्या तांत्रिक सुरक्षिततेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल गंभीर शंका निर्माण झाली आहे. गाड्यांचा अपघात झाला, त्या वेळी गाड्या चालकाकडून चालवण्याच्या स्थितीत होत्या कि स्वयंचलित होत्या ?, हे संबंधित आस्थापनाने स्पष्ट केलेले नाही.
Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूर (बिहार) येथे खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक घायाळ
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला