बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे मत
छतरपूर (मध्यप्रदेश) – राष्ट्रगीत गाण्याची परंपरा चांगली आहे. प्रत्येक मंदिर, मशीद आणि चर्च यांमध्ये राष्ट्रगीत लावले पाहिजे. धर्मभक्तीसमवेत देशभक्तीही असली पाहिजे. आठवड्यात किमान एकदा तरी राष्ट्रगीत झालेच पाहिजे, जेणेकरून राष्ट्राविषयीच्या कर्तव्यांसाठी आपण एकत्र राहू, असे विधान येथील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले. ते येथे एका धार्मिक कार्यक्रमात बोलत होते.
🇮🇳 “Religious devotion + love for India = true worship. National Anthem in every place of worship!” – Pandit Dhirendra Krishna Shastri #BageshwarDhamSarkar#Navratri@bageshwardham
🎥 Courtesy: @abplive pic.twitter.com/wbnx0O5dXG— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 20, 2025
भटक्या गायींसाठी सरकारने प्रत्येक तालुका आणि जिल्हा येथे गोशाळा उभाराव्यात !
भटक्या गायींविषयी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी म्हटले की, केंद्र आणि विशेषतः मध्यप्रदेश सरकारने गायींसाठी तातडीने ‘अभयारण्य योजना’ राबवून प्रत्येक तालुका किंवा जिल्ह्यात ५ गोशाळा उभाराव्यात. प्रत्येक गोशाळेत ५ ते १० सहस्र गोवंश ठेवण्याची व्यवस्था असावी. असे झाल्यास प्रत्येक जिल्ह्यातील सहस्रो गोमाता रस्त्यांवरून हटून त्या अभयारण्यात सुव्यवस्थित रहातील.

धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court