मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ध्वनीचित्रीकरणाशी संबंधित सेवा करतो. मला व्यष्टी साधना आणि सेवा करतांना काही अडचणी आल्यास किंवा साधनेच्या स्तरावर मार्गदर्शन हवे असल्यास सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ते मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडून मिळत आहे. त्यामुळे मला साधना आणि सेवा करण्यातील आनंद मिळत आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी व्यष्टी साधनेत मला केलेले मार्गदर्शन, त्या माझ्या सेवेतील अडचणी सोडवत असतांना मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनातून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय करण्यास अडचण येणे
‘काही वर्षांपूर्वी माझ्यावर त्रासदायक आवरण आले होते. त्यासाठी एका संतांनी मला ५ घंटे नामजपादी उपाय करण्यास सांगितले होते. त्या कालावधीत दिवाळीनिमित्त धर्मसत्संगांचे चित्रीकरण चालू होते. मी त्या सत्संगासाठी एक तातडीची सेवा करत होतो. तेव्हा मला ५ घंटे नामजपादी उपाय पूर्ण करण्यास अडचण येत होती.
१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकाचे नामजपादी उपाय अन् सेवा यांतील अडचण त्वरित सोडवणे : याविषयी मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सांगितले. तेव्हा त्या लगेच मला म्हणाल्या, ‘‘तू संतांनी वास्तव्य केलेल्या आश्रमातील खोलीत रहायला येऊ शकतो का ? त्यामुळे रात्री तुझ्या झोपेच्या वेळी चैतन्य मिळून दिवसभर तू उत्साहाने सेवा करशील.’’ श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सांगण्यानुसार मी १५ दिवस त्या आश्रमात रहायला आलो. त्यामुळे मी पुढील १५ दिवस उत्साहाने सेवा करू शकलो.
२. प्रलंबित सेवा पूर्ण करण्यासाठी साधकांना साहाय्य करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ !
२ अ. प्रलंबित सेवेतील अडचणी आणि कारणे समजून घेणे : चित्रीकरणाची एक सेवा बरीच वर्षे प्रलंबित होती. त्यामुळे त्या सेवेशी संबंधित सर्व साधकांना ताण आला होता. त्यामुळे ‘साधकांवर त्रासदायक आवरण वाढणे, निरुत्साह वाटणे, सेवेतील आनंद न मिळणे’, असे त्रास होत होते. यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी एक दिवस त्या सेवेशी संबंधित सर्व साधकांचा सत्संग घेतला. त्यांनी साधकांच्या सेवेतील अडचणी आणि सेवा प्रलंबित रहाण्यामागील कारणे समजून घेतली.
२ आ. प्रलंबित सेवेचे नियोजन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांना अपेक्षित असे प्रयत्न होण्यासाठी त्यांनाच शरण जाण्यास सांगणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘ती सेवा पूर्ण करण्यासाठी कोणते प्रयत्न करू शकतो ? त्याचे नियोजन कसे करू शकतो ?’, याचे आम्हाला चिंतन करायला सांगितले. तसेच आमचे दिवसभराचे सेवेचे नियोजनही लिहून देण्यास सांगितले. आम्ही सूत्रे लिहून दिल्यावर त्यांनी आमचा सत्संग घेऊन सेवेची व्याप्ती, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ आणि नामजपादी उपाय यांचा विचार करून नियोजन करायला सांगितले. तसेच त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘ही सेवा आपण नव्याने चालू करत आहोत’, असा भाव ठेवा. केवळ गुरुदेवांवर श्रद्धा ठेवा. त्यांना अपेक्षित असे प्रयत्न होण्यासाठी त्यांनाच शरण जा. तुम्हाला देवाच्या कृपेची प्रचीती नक्की येईल आणि लवकरच ही प्रलंबित सेवा पूर्ण होईल.’’

सत्संगात संबंधित सर्व साधकांना विचार मांडायला सांगून सेवेत सहभागी करून घेणे

मोठ्या सोहळ्यांचे चित्रीकरण करणे आणि छायाचित्रे काढणे या सेवांचे आम्ही नियोजन करत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनासाठी जेव्हा त्यांच्या समवेत सत्संग असतो, तेव्हा त्या प्रत्येक साधकाला त्याचे विचार मांडायला सांगतात. प्रत्येकाला काही वेगळी संकल्पना सुचवायची असल्यास त्या प्रत्येकाला आवर्जून विचारतात आणि म्हणतात, ‘‘देव कुणाच्या माध्यमातून काय सुचवेल ?’, हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाचे विचार मोलाचे असतात.’’ तसेच सत्संगामध्ये त्यांचे बोलणे झाल्यानंतर त्या एक वाक्य नेहमी म्हणतात, ‘‘माझे सांगण्यात किंवा समजून घेण्यात काही चुकले असेल, तर सांगा.’’ यामध्ये त्यांची सर्वसमावेशकता आणि अहंशून्यता लक्षात येते.
– श्री. केदार नाईक
२ इ. शिस्त आणि प्रेम यांची सांगड घालून साधकांच्या प्रलंबित सेवेचा आढावा घेणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आम्हाला या सेवेचा प्रतिदिन आढावा द्यायला सांगितला. ‘आढावा देतांना तो ‘गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवा; म्हणजे तुमची शरणागती वाढेल’, असे त्यांनी आम्हाला सांगितले. सेवा चालू केल्यावर एक मासाने त्यांनी आमचा सत्संग घेतला. तेव्हा त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘सर्वांनी छान सेवा केली. तुम्ही देत असलेल्या आढाव्यातून भाव आणि तळमळ जाणवली, तसेच स्पंदनेही चांगली येत आहेत.’’ असे सांगितले.
त्यानंतर त्यांनी काही कालावधीनंतर प्रतिदिन दिला जाणार्या आढाव्याचा कालावधी न्यून केला. यामागे ‘आम्हाला शिस्त लागावी आणि आढावा देण्यातील सातत्यही रहावे’, हा उद्देश होता.
२ ई. प्रलंबित सेवा पूर्ण झाल्यावर कर्तेपणा न घेणे : प्रलंबित सेवा पूर्ण होण्यासाठीचे सर्व नियोजन श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे केले होते. त्यांनीच त्यासाठी संकल्प करून आम्हाला आशीर्वाद दिले होते. खरेतर त्यामुळेच आमच्यात उत्साह निर्माण होऊन ती सेवा पूर्ण झाली. त्यांनी त्याचे कोणतेही श्रेय स्वतःकडे न घेता आम्हाला प्रसाद देऊन बळही दिले.
३. साधकांना चुकांची जाणीव करून देऊन साधनेसाठी प्रोत्साहन देणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !
चित्रीकरण विभागांतर्गत काही चुका झाल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सांगतात, ‘‘तुम्ही पुष्कळ शारीरिक सेवा करता. तुमचे शरीर देवाच्या चरणी झिजत आहे. त्याच प्रमाणात तुमचे मनही झिजवा. देव नक्की साहाय्य करील.’’ यामागे ‘आमची साधना आणि सेवा चांगली अन् देवाला अपेक्षित अशी व्हावी’, हा त्यांचा उद्देश असतो.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला आतापर्यंत अनेक प्रसंग आणि अनौपचारिक चर्चा यां वेळी आईच्या मायेने आश्वस्त केले आहे. त्यांनी प्रत्येक वेळी मला मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर मार्गदर्शन करून साधनेमध्ये आणि गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणांशी ठेवले आहे’, याबद्दल त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– श्री. केदार नाईक, ढवळी, फोंडा, गोवा. (१६.९.२०२४)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !