खासदार सॅनफोर्ड बिशप यांचे अमेरिकेच्या जनतेला आवाहन

वॉशिंग्टन (अमेरिका) – आपण ‘हिंदूफोबिया’च्या (हिंदु धर्माबद्दलच्या द्वेषाच्या) विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. हिंदु धर्माचा द्वेष करण्याचा निषेध करणारा ठराव संमत करणारे माझे जॉर्जिया हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले आहे, असे अमेरिकेचे खासदार सॅनफोर्ड बिशप यांनी म्हटले आहे. खासदार सॅनफोर्ड बिशप यांनी हे विधान वॉशिंग्टन डी.सी. मधील अमेरिकी संसदेच्या आवारात आयोजित एका विशेष कार्यक्रमात आणि त्यांच्या अधिकृत माध्यमांवरील खात्यावरून केले.
🇺🇸 "We must stand firmly against Hinduphobia!" – US Congressman Sanford Bishop
At a Hindu Heritage Month conference at the US Capitol, Congressman @SanfordBishop highlighted that Georgia became the first US state to pass a resolution condemning Hinduphobia in 2023.
He also… pic.twitter.com/iOthIXjw4B
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 24, 2026
जॉर्जिया राज्याने हा ठराव १ एप्रिल २०२३ मध्येच संमत केला आहे. सध्या अमेरिकेत ‘हिंदू वारसा महिन्या’च्या संदर्भातील एका विशेष जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमेरिकेतील हिंदु समुदायाने देशाच्या प्रगतीत दिलेल्या योगदानाचा गौरव केला गेला. त्या वेळी खासदार सॅनफोर्ड बोलत होते.
गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतील काही राज्यांमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर झालेली आक्रमणे आणि हिंदुद्वेषाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सॅनफोर्ड बोलत होते.
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले