विटा (जिल्हा सांगली) येथे धर्मांधांकडून गणेशोत्सव मंडळाच्या ३ कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमण !

  • आरती आणि भक्तीगीते लावण्याला धर्मांधांचा विरोध

  • हिंदूंमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न

सांगली, १९ सप्टेंबर (वार्ता.) – विटा (जिल्हा सांगली) येथील आय.टी.आय महाविद्यालय परिसरातील ‘एकता गणेशोत्सव मंडळा’च्या ३ कार्यकर्त्यांना धर्मांधांनी मारहाण केल्याची घटना घडली. अनंत चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर धर्मांध मुसलमानांनी ‘एकता गणेशोत्सव मंडळा’चे पदाधिकारी श्री. धनराज कातारी यांच्यासह २ कार्यकर्त्यांवर प्राणघातक आक्रमण केले. गणेशोत्सवाच्या आरंभीपासून धर्मांधांनी हा गणेशोत्सव बंद पाडण्याचा प्रयत्न केला. धर्मांधांची एवढी दहशत होती की, या भागातील हिंदूंनी पलायन करण्यास प्रारंभ केला असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना दाबण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. प्राणघातक आक्रमण करणार्‍या धर्मांधांना एका दिवसात जामीनही मिळाला.

श्री. धनराज कातारी यांच्या डोक्यावर धर्मांधांनी केलेले खोल वार

गणेशोत्सव साजरा करू नये, यासाठी दबाव आणून मुसलमानांनी माझ्यावर आक्रमण केले ! – धनराज कातारी

याविषयी एकता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी श्री. धनराज कातारी म्हणाले,

१. प्रतीवर्षीप्रमाणे ‘एकता युवा मित्र गणेशोत्सव मंडळा’च्या वतीने गणेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी परिसरातील धर्मांध मुसलमानांनी गणेशोत्सवाला प्रतिबंध करण्यासाठी ‘कार्यकर्त्यांनी येथे गणेशोत्सवाचा मंडप उभारायचा नाही आणि मंडप उभारला, तरी मशिदीच्या नमाजाच्या वेळी भक्तीगीते लावायची नाहीत, तसेच आरती करायची नाही. आरती वगैरे ध्वनीक्षेपकावर लावायची नाही’, अशी दमदाटी केली.

२. ८ सप्टेंबर या दिवशी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर त्याच रात्री ८.१५ वाजता धर्मांध मुसलमानांनी माझ्यावर तलवार, कोयता आणि दांडके यांद्वारे प्राणघातक आक्रमण केले. त्या वेळी माझा भाऊ श्री. राज अमर कातारी आणि मित्र श्री. गणेश कांबळे यांनी आरडाओरड करून मला सोडवले.

मुसलमानांच्या मारहाणीत घायाळ झालेले श्री. हर्षद घाडगे

३. या आक्रमणात माझ्या डोक्याला मोठी गंभीर जखम झाली. डोक्यावर ३८ टाके पडले आहेत. हाताचा अस्थिभंग झाला आहे.

४. माझे मित्र आणि सहकारी श्री. हर्षद घाडगे यांच्यासह आणखी एका कार्यकर्त्यावर धर्मांधांनी आक्रमण केले.

५. हे आक्रमण केल्यानंतर जमाव जमवून आणि झुंडशाही करून आमच्यावर येथे दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे.

६. एवढे मोठे आक्रमण केले असतांनाही आरोपींना एका दिवसात जामीनही मिळाला. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक होते. जामीन मिळाल्यानंतर धर्मांधांनी विटा शहरातून फेरी काढून फटाक्यांची आतषबाजी केली.

प्राणघातक आक्रमण केले असतांनाही पोलिसांनी गुन्हा नोंदवतांना ३०७ कलम लावले नाही !

विटा पोलिसांनी आक्रमण करणार्‍या धर्मांध मुसलमानांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवले आहेत; मात्र ‘मॉब लिंचिग’चा (जमावाने मारहाण करण्याचा) गुन्हा आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याविषयी कलम ३०७ नुसार गुन्हा नोंदवला नाही. इतकेच नव्हे, तर या घटनेत मारहाण करणारे एकूण २० धर्मांध असतांनाही प्रत्यक्षात ८ धर्मांधांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. यातून पोलिसांनी आक्रमण करणार्‍या धर्मांध मुसलमानांना झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा आहे.

धर्मांध आरोपींची नावे

टीपू सुलतान गटाचे रहीम राज कादरी, जमीर मुजावर, रहीम मुजावर, कैफ मुल्ला, हुसेन मुल्ला, सोहेल पटेल, यासीन मुजावर, नवाज मुजावर यांच्यासह ३० ते ४० जण

हिंदूंमध्ये दहशत निर्माण करून मुसलमानबहुल भाग बनवण्याचा कट ! – स्थानिक हिंदूंचे मत

‘आय.टी.आय महाविद्यालय परिसरातील रहाणार्‍या हिंदूंमध्ये दहशत निर्माण करून त्यांना येथून पलायन करण्यास भाग पाडणे आणि हा भाग मुसलमानबहुल बनवणे, असाच या दहशतीचा उद्देश आहे’, असे स्थानिक हिंदूंचे मत आहे. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना धर्मांधांकडून मारहाण झाल्यानंतर स्थानिक पोलिसांकडे एकता गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली; मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास विलंब केला, तसेच परस्परविरोधी तक्रारी प्रविष्ट केल्या. (पोलीस विलंब का करतात ? ते धर्मांधांना घाबरतात का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • असे व्हायला विटा भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी, समाजवादी पक्ष, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना धर्मांधांचे असे धाडस कसे होते ? सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! हिंदूंनीही संघटित होऊन अशांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे !
  • अशा बातम्यांना वृत्तवाहिन्या प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !