रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या महालय श्राद्धविधीच्या आधी आणि श्राद्धविधीनंतर साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती   

‘२६.९.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पितरांसाठी महालय श्राद्धविधी करण्याचे भाग्य मला लाभले. त्या वेळी मला श्राद्धविधीच्या आधी आणि श्राद्धविधीनंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. ‘श्राद्धविधीच्या आदल्या रात्री मी ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप करत झोपलो. त्यानंतर काही वेळाने मला स्वप्न पडले. त्या स्वप्नातही ‘माझा नामजप चालू होता’, असे मला जाणवले. तेव्हा नामजप करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला.

श्री. लक्ष्मीनारायण आचार्य

२. श्राद्धविधीच्या वेळी पितरांना भोजन देण्याचा विधी होता. तेव्हा मी पितरांना ‘तुम्ही तृप्त आहात का ?’, असे विचारले. त्या वेळी ते मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘आम्ही तृप्त आहोत.’ तेव्हा ‘पितरांना आनंद झाला आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.

३. त्या वेळी मला परम पूज्य गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) आठवण झाली आणि माझी भावजागृती झाली. माझी भावावस्था पुष्कळ वेळ टिकली.

‘श्री गुरूंच्या कृपेने माझ्याकडून भावपूर्ण श्राद्धविधी झाले’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

श्रीगुरुचरणार्पणमस्तु !’

– श्री. लक्ष्मीनारायण आचार्य, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.