नवरात्रोत्सवापूर्वी खड्डे न बुजवल्यास शिवसेनेची जनआंदोलनाची चेतावणी !

ठाणे – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. २ दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आयुक्त अभिनव गोयल यांना सोबत घेऊन रस्त्यांची ही स्थिती दाखवली होती, तर शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी महानगरपालिकेला नवरात्रोत्सवापूर्वी तातडीने खड्डे भरणीची कामे पूर्ण करा, असे कळवले होते. आयुक्तांनी पहाणी दौरा करूनही खड्डे भरणीची कामे पूर्ण केली जात नसल्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी ‘नवरात्रोत्सवापूर्वी खड्डे भरा, अन्यथा जनआंदोलन उभारू आणि खड्ड्यात अधिकार्यांना गाडू’, अशी चेतावणी दिली आहे.
संपादकीय भूमिकाअशी चेतावणी देण्याची वेळ का येते ? |
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !