धुळे येथे ‘भगव्या आतंकवादाचे फेक नॅरेटिव्ह’ या विषयावर विशेष परिसंवाद !

धुळे – आज अनेक खटल्यांतून हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते निर्दोष बाहेर पडत आहेत; पण मालेगाव बाँबस्फोटातील अटक केलेले मुळात निर्दोषच होते. केवळ भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांना गोवण्यात आले होते. त्यांच्या आयुष्यातील गेलेली वर्षे, त्यांना झालेला त्रास, कुटुंबियांना झालेला त्रास हे सर्व न भरून निघण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांना अजूनही न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही, तर भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा ज्यांनी पसरवला, त्यासाठी साथ दिली, अशांवर कठोर कारवाई होणे, हाच या निष्पाप हिंदूंसाठी खरा न्याय ठरील, असे परखड मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. धुळे येथील कान्हा रिजन्सी येथे १४ सप्टेंबर या दिवशी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ‘भगव्या आतंकवादाचे फेक नॅरेटिव्ह’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात ते बोलत होते.
या परिसंवादात हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, दाभोलकर हत्या प्रकरणी निर्दोष मुक्त झालेले श्री. विक्रम भावे, मालेगाव स्फोट प्रकरणी निर्दोष मुक्त झालेले श्री. समीर कुळकर्णी आणि गोवा बाँबस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्त झालेले श्री. प्रशांत जुवेकर सहभागी झाले होते. परिसंवादात हिंदु जनजागृती समितीचे श्री. मयूर बागुल यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला धुळे येथील प्रतिष्ठित व्यावसायिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रांत कार्य करणारे अनेक मान्यवर, तसेच युवा वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
परिसंवादात मांडले जाणारे विषय, साम्यवादी, तसेच भ्रष्ट अधिकारी यांची पोलखोल यांमुळे वक्त्यांच्या भाषणांना उपस्थित विविध क्षेत्रांतील अभ्यासू, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून, तसेच ‘जय श्रीराम ।’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ यांसह विविध घोषणा देऊन प्रतिसाद दिला.
निष्पाप हिंदूंचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे अधिकारी मोकाट असणे हे दुर्भाग्य ! – समीर कुळकर्णी (मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात निर्दाेष मुक्तता झालेले हिंदुत्वनिष्ठ)
वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी माझ्यासह अनेक निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात आले. त्यांचा अतोनात छळ केला गेला. आम्ही सर्व हिंदू निष्पाप असतांना आम्हाला हिंदु आतंकवादी दाखवण्याचे कुटील कारस्थान रचले गेले. एवढेच नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक
डॉ. मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, श्री श्री रविशंकर, इंद्रेश कुमार आदी अनेक हिंदु नेत्यांची नावे सांगण्यासाठी भ्रष्ट अधिकार्यांनी दबाव टाकला होता; पण ज्यांनी हा दबाव टाकला होता ते अधिकारी, कर्मचारी आजही प्रशासकीय सेवेत आहेत, त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.
‘भगव्या आतंकवादाचा बागूलबुवा पसरवून संपूर्ण हिंदु समाजाला ज्यांनी अपकीर्त केले, अशांना हिंदु समाजच अद्दल घडवील’, यावर माझी ठाम श्रद्धा आहे, असे विधान ‘दाभोलकर हत्या आणि मी’ पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे यांनी केले. या वेळी मडगाव बाँबस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्त झालेले प्रशांत जुवेकर यांनीही सांगितले, ‘‘एका निष्पाप हिंदूला त्रास देण्याचे फळ संबंधित सर्व अधिकार्यांना मिळेल, अशी माझी निश्चिती आहे.’’
संपादकीय भूमिकाअस्तित्वात नसलेल्या भगव्या आतंकवादाच्या नावाखाली हिंदूंना कारागृहात टाकणार्यावर कारवाई कधी होणार ? |
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !
भडगाव (जिल्हा जळगाव) येथे युरियासमवेत अन्य रासायनिक खते घेण्याची शासकीय कृषी केंद्रांतून सक्ती !
मुणगे येथे अणूऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध