
मोशी-बोर्हाडेवाडी (पिंपरी-चिंचवड), १३ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदवी स्वराज्याचे पराक्रमी योद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती शिल्प ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या शिल्पाच्या अनावरणाचा ऐतिहासिक सोहळा १४ सप्टेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या पुढाकाराने उभा रहात असलेला हा स्मारक प्रकल्प केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानाचे अभिमानस्थान ठरणार आहे. परिसरात उभारण्यात येणार्या ‘शंभूसृष्टी’मुळे शिवशंभूंचा गौरवशाली इतिहास पुढील पिढ्यांसाठी जिवंत होईल !
कार्यक्रमाच्या वेळी देशभरातून आलेले ३ सहस्र ढोल, १ सहस्र ताशा आणि ५०० भगवे ध्वज पथक गगनभेदी गजर करत छत्रपती संभाजी महाराज यांना अभूतपूर्व मानवंदना अर्पण करणार आहेत. ढोल-ताशांच्या लयबद्ध निनादात भगवे ध्वज फडकत असतांना ‘हिंदूभूषण’ शिल्पाचे अनावरण हा क्षण महाराष्ट्राच्या वैभवाचे नवे पर्व ठरणार आहे. ‘या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार होण्यासाठी अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित रहावे’, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले