|

मद्दुरू (मंड्या) – कर्नाटकामधील विजापूरचे भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बसनगौडा आर्. पाटील उपाख्य यत्नाळ यांच्यावर मद्दुरू येथे कथित चिथावणीखोर भाषण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाजपचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार सी.टी. रवि यांच्याविरुद्ध नुकताच गुन्हा नोंदवल्यानंतर २४ घंट्यांच्या आत आमदार पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
🚨 Maddur: Karnataka Police suo moto file an FIR against Ex Union Minister @BasanagoudaBJP for an alleged “inflammatory” speech during a protest against the attack on Ganesh Visarjan from a mosque.
That’s 2 BJP MLAs booked in just 24 hrs!
❓Do they ever act on their own against… https://t.co/s464Hcy4Yf pic.twitter.com/e7FoyR7NdW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 12, 2025
श्री गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी ११ सप्टेंबरला मद्दुरू परिसराला भेट दिली आणि भाषण केले. या भाषणामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असून त्यावरून पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ यांच्या तक्रारीवरून आमदार पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६(१)(अ) (गटांमध्ये वैर निर्माण करणे), कलम २९९ (धार्मिक भावना दुखावणे) आणि कलम ३५३(२) (जनतेत गोंधळ निर्माण करणारी विधाने करणे) या कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
८ सप्टेंबर या दिवशी विसर्जन मिरवणूक मशिदीसमोरून जात असतांना धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दगडफेकीनंतर या सर्व घटना घडल्या आहेत. या प्रकरणी आतार्यंत २१ जणांना अटक करण्यात आली असून सध्या तेथे तणावाचे वातावरण आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंविरुद्ध सतत चिथावणीखोर भाषणे करणारे आणि त्यांना धमकी देणारे यांच्याविरुद्ध पोलीस कधी स्वतःहून तक्रार करून गुन्हा नोंदवतात का ? हा पोलिसांचा हिंदुद्वेष आहे ! |
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन