
‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून फर्मागुडी (गोवा) येथील ‘इन्फिनिटी’ मैदानावर १७ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या तिसर्या दिवशी (१९.५.२०२५ या दिवशी) सकाळच्या सत्रात कार्यक्रमाच्या आरंभी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विविधांगी कार्याबद्दल उपस्थितांना अवगत करण्यात आले. ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) औक्षण केले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ‘संगीत विभागा’तील साधिकांनी ‘गुरुमहिमा संकीर्तन’ नृत्य आणि कृतज्ञता गीत सादर केले.

‘या कार्यक्रमाचा महोत्सवाला उपस्थित साधक-श्रोत्यांवर आणि कार्यक्रमात विषय मांडणारे साधक अन् संत यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतात?’, तसेच ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके, नृत्य आणि कृतज्ञता गीत सादर करणार्यांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतात?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.
१. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन
महोत्सवाला उपस्थित असलेले ४ साधक आणि ४ साधिका या संशोधनात्मक प्रयोगात सहभागी झाले. या सर्वांची कार्यक्रमापूर्वी आणि कार्यक्रमानंतर छायाचित्रे काढण्यात आली. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विविधांगी कार्यदर्शन’ या संदर्भात विषय मांडणारे २ साधक वक्ते आणि २ ‘सद्गुरु’पदावरील संत वक्ते यांची विषय मांडण्यापूर्वी अन् विषय मांडल्यानंतर छायाचित्रे काढण्यात आली. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणारे साधक-साधिका, तसेच ‘गुरुमहिमा संकीर्तन’ नृत्य आणि कृतज्ञता गीत सादर करणार्या साधिका यांची कार्यक्रम सादर करण्यापूर्वी आणि कार्यक्रम सादर केल्यानंतर छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.
१ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्यदर्शन आणि जन्मोत्सव’ या कार्यक्रमाचा साधक-श्रोत्यांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे : प्रयोगातील २ साधक आणि ४ साधिका यांच्यामध्ये कार्यक्रमापूर्वी नकारात्मक ऊर्जा आढळली; पण कार्यक्रमानंतर ती नाहीशी झाली. त्यासह कार्यक्रमानंतर त्यांच्यातील सकारात्मक उर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.


टीप १ : काही अपरिहार्य कारणाने साधकाला या प्रयोगात सहभागी होता आले नाही.
१ अ १. निष्कर्ष : कार्यक्रमानंतर प्रयोगातील साधक आणि साधिका यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने ४० ते ५० मीटरने वाढ झाली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्यदर्शन आणि जन्मोत्सव’ या कार्यक्रमाचा साधक-श्रोत्यांना आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभ झाला’, असे लक्षात येते.
१ आ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विविधांगी कार्यदर्शन’ या संदर्भात महोत्सवात विषय मांडल्यावर साधक आणि संत वक्ते यांच्यावर झालेले सकारात्मक परिणाम : साधक आणि संत वक्ते यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही, तसेच त्यांनी विषय मांडल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. साधक आणि संत वक्ते यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

१ आ १. निष्कर्ष : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विविधांगी कार्यदर्शन या संदर्भात महोत्सवात विषय मांडल्यानंतर साधक आणि संत वक्ते यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने १४१ मीटर ते १३९० मीटरने वाढ झाली. यातून ‘साधक आणि संत वक्ते यांनी महोत्सवात विषय मांडल्यानंतर त्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला.’, असे लक्षात येते.
१ इ. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके, नृत्य आणि गायन या कार्यक्रमांचा ते सादर करणार्यांवर सकारात्मक परिणाम होणे : स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके, नृत्य आणि गायन सादर करण्यापूर्वी काही साधक अन् साधिका यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा होती; पण त्यांनी कार्यक्रम सादर केल्यानंतर ती न्यून किंवा नाहीशी झाली आणि कार्यक्रम सादर केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा अधिक वाढली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.७.२०२५) (क्रमश: पुढच्या रविवारी)
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !