मार्क्स लेनिनवाद या विचारसरणीने जवळजवळ संपूर्ण २० व्या शतकात जगावर परिणाम केला. मुख्यतः मार्क्सवाद्यांनाच ‘साम्यवादी’ म्हणजेच ‘डावे’ म्हटले जाते. मार्क्सवाद्यांविना अन्य साम्यवादीही मार्क्सवादी तत्त्वांचा अंगिकार करतात. या मार्क्स-लेनिनवादाची कथा रोमहर्षक आहे. वर्ष १९४३ ते १९५६ या कालावधीत अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक हावर्ड फास्ट हे तेथील साम्यवादी पक्षाचे सक्रिय नेते होते. त्यांनी ‘द नेकेड गॉड : द रायटर अँड द कम्युनिस्ट पार्टी’ या त्यांच्या पुस्तकात ‘साम्यवादाच्या भयंकर शोकांतिकेला केवळ साहित्याच्या भाषेतच सांगितले जाऊ शकते. त्याला व्यक्त करायला सामान्य भाषा किंवा समाज विज्ञानाचा शब्दसमूह असमर्थ ठरतो’, असे म्हटले आहे.
५ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘साम्यवादाचे खरे स्वरूप उघड करणारे रशियातील लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन, भारतीय राजकारणातील वर्चस्व असणारा मार्क्सवादाचा प्रभाव असलेला नेहरूवाद अन् साम्यवाद शिकवणार्या भारतातील शाळा आणि महाविद्यालये’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/953147.html

७. स्वातंत्र्यानंतर रशियाच्या व्यवहार पद्धतीने प्रेरित झालेली भारतीय शासनव्यवस्था
स्वतंत्र भारताचे औपचारिक शासन तंत्र हे ब्रिटिशांचे अनुकरण आहे. भारतातील संपूर्ण दंड संहिता, शासकीय पदे, टप्पे आणि राज्यघटना हे याचेच उदाहरण आहे; परंतु व्यवहारामध्ये शासनाचे आत्मा असलेले पहिले पंतप्रधान नेहरू यांच्या साम्यवादाविषयीच्या मोहामुळे अन् सत्तेवरील त्यांच्या एकहाती प्रभावामुळे भारतीय शासनव्यवस्था रशियाच्या व्यवहारपद्धतीने प्रेरित झाली. त्या वेळी ज्या वाईट परंपरा सिद्ध झाल्या किंवा चांगल्या परंपरा होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे पुढे येणारे शासक, प्रशासक, प्रसारमाध्यमे, शैक्षणिक संस्था इत्यादींसाठी एक सुनिश्चित अनुकरण करण्याजोगे उदाहरण उभे केले. आता सवयीनुसार सर्व व्यवस्था त्याच मार्गाने चालली आहे; पण हे काही पूर्णपणे पाश्चात्त्य तंत्र नाही किंवा भारतीय परंपरा नाही, तर ती निकृष्ट दर्जाच्या साम्यवादाची नक्कल आहे, ज्यामध्ये लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, पत्रकार कित्येक दशकांपासून कार्यरत आहेत.
या गोष्टींवर लक्ष देण्यात आलेले नाही. शेवटी ज्या चष्म्यामुळे आपली दृष्टी बाधित झाली आहे, त्याचा दोष आपल्याला कसा दिसेल ? वस्तूतः आपले शिक्षण आणि विचारसरणी यांमध्ये नेहरूवाद पुष्कळ खोलवर घुसला आहे. योग्यता बाजूला ठेवून आपल्या माणसांना समित्या, उच्च शैक्षणिक पदे, संस्थांमध्ये ठेवणे ही ब्रिटीश नव्हे, तर सोव्हिएत परंपरा आहे. सर्व भवने, योजना, जागा इत्यादींचे नामकरण पक्षाच्या नेत्यांच्या नावाने करणे, म्हणजे पक्षाची गुलामगिरी करण्यासारखे आहे, जो साम्यवादी देशांचा नेहमीचा नियम होता.
८. शिक्षण आणि विचारसरणी यांमध्ये खोलवर घुसलेला नेहरूवाद म्हणजे वैचारिक गुलामगिरी !

हे केवळ नामकरणापर्यंत मर्यादित नाही. साम्यवादी देशांमध्ये प्रत्येक पक्ष कोणत्या तरी नेत्याच्या अंधभक्तीवरच आधारित होता. विषय क्रीडाविषयक असो किंवा सिनेमा असो, दर्शन असो किंवा परमाणु विज्ञान असो, प्रत्येकामध्ये लेनिन, माओ यांच्या उद्धरणांच्या मार्गदर्शनाविषयी कोणतीही चर्चा आणि संशोधन शक्य नव्हते. हीच गुलामगिरी आपल्या देशात प्रगतीवादाच्या अंधपूजेमध्ये झळकत राहिली, जे नेहरूवादाचे दुसरे नाव आहे. यामध्ये असे होते की, कोणत्याही विद्वानाचे मूल्यांकन त्याच्या कार्यावर नव्हे, तर पक्षाचा नेता किंवा उच्च अधिकारी यांच्या पसंतीवर अवलंबून असते. सोव्हिएत संघामध्ये जे काम ‘कम्युनिस्ट कमिसार’ (साम्यवाद्यांची तत्त्वे आणि धोरणे शिकवण्यासाठी लष्करी तुकडीत नियुक्त केलेला साम्यवादी पक्षाचा अधिकारी) करत होते, तेच काम येथील सत्ताधारी पक्षाचे प्रगतीशील नेते आणि त्यांचे सहकारी अधिकारी, प्राध्यापक यांनी केले. ही परंपरा नेहरूंच्या सत्तेच्या काळात चालू झाली आणि पूर्ण शक्तीने स्थापन केली गेली. आज दुसर्या पक्षांची सत्ता आली असली, तरीही ती परंपरा आज जोमाने चालू आहे.
९. भारताचे बौद्धिक जीवन स्वतःच्या अधीन करणारा सोव्हिएत पंथीय प्रगतीवाद
साम्यवादी प्रगतीवादाची विषवल्ली आपोआप फळा-फुलांनी बहरलेली नाही. हेतूपूर्वक ती पसरवून भारतीय परंपरा नष्ट केली गेली. हे इतके स्पष्ट आहे की, कुणीही याची प्रामाणिकपणे चौकशी स्वतः करू शकतो. न आवडणारे नेते, विद्वान, पत्रकार यांना काळ्या सूचीत टाकणे आणि विश्वस्त सहकार्यांना पुढे करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, ही प्रवृत्ती नेहरूंच्या काळातच चालू झाली. हे सोव्हिएत साम्यवादाचे भारतीय नेहरूपंथी रूप होते. त्यानुसार स्वतंत्र विचार मांडणार्या लेखकांना त्रास देणे, त्यांचे लेखन दाबून ठेवणे, त्यांच्यावर कलंक लावणे, अशी घातक कामे तेव्हा चालू झाली. सत्तेच्या लोभामुळे सोव्हिएतपंथी ‘प्रगतीवादा’ने भारताचे बौद्धिक जीवन स्वतःच्या अधीन केले आणि आजही त्याच पद्धतीने चालू आहे.
ज्या साम्यवादी अंधविश्वासांमुळे आपली अर्थ-विदेश नीती, शिक्षण आणि साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रम कित्येक दशकांपासून चालत आली आहे, त्याचा खोलवर परिणाम आजही दिसून येतो. त्यांच्याकडे सम्यक दृष्टीने पाहिले, तर लक्षात येते की, स्वतंत्र भारतात वैचारिकदृष्ट्या मूर्ख गोष्टींचा आरंभ कुठे झाला आहे ? आणि त्यांनी आपल्याला मानसिक रूपाने कसे दास बनवले आहे ? याविषयी माहिती मिळते. प्रत्येक नामकरणामध्ये नेहरू-नेहरू किंवा अटल-अटल यांचा वापर करणे, म्हणजे विचारहीनता, मानसिक जडत्व आणि आत्मसन्मानाचा अभाव आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
विविध क्षेत्रांमधील हिंदुविरोधी नेहरूवादी विचारसरणी नष्ट करण्याची आवश्यकता !
जसे अर्थव्यवस्थेमध्ये नेहरूवादाला ‘नमस्कार’ (वर्ष १९९१ मध्ये नरसिंह राव यांच्या धोरणानुसार) करण्यात आल्यानंतर भारताचा आत्मविश्वास वाढला आणि काही प्रमाणात भौतिक प्रगती शक्य झाली. त्याचप्रमाणे चिंतन, विचार आणि शिक्षण या क्षेत्रांना नेहरूवादी हिंदुविरोधी कोळ्याच्या जाळ्यातून मुक्त केल्यानंतरच भारताचा राजनैतिक, बौद्धिक अन् वैचारिक विकास होईल. हे सत्य जेवढे लवकर आपल्या लक्षात येईल, तेवढे अधिक चांगले होईल. साम्यवादी मानसिकतेनुसार केवळ पक्षांतरबंदीचा आग्रह भारताला कधीही स्वतःची संस्कृती आणि गौरव देऊ शकत नाही, हे मूलभूत सत्य समजून घेऊन आताच्या सत्ताधिशांनी साम्यवाद्यांना धडा शिकवून भारतीय ज्ञान, परंपरा यांच्यावर आधारित धोरणांचे अनुकरण केले पाहिजे.
लेखक : प्रा. शंकर शरण
१०. आर्थिक विकास, म्हणजे देशाच्या सामाजिक स्वास्थ्याची खात्री नव्हे !
प्रशासनामध्ये प्रत्येक स्तरावर समिती प्रणालीचा उपयोग करणे, हे ब्रिटिशांचे अनुकरण आहे. प्रत्येक समितीमध्ये ४ जण स्वतःचे चाहते ठेवणे, त्यांच्याकडून आपल्या मनात आहे ती गोष्ट लिहून घेणे आणि त्याला ‘गंभीर दस्तऐवज’, असे म्हणून जनतेला धोका देणे, ही शुद्ध सोव्हिएत परंपरा आहे. आज हा रोग मोठ्या प्रमाणात पसरला आहे.
भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या आरंभीच्या काळातील ‘प्रगतीशील’ प्राध्यापक सोव्हिएत लेखकाप्रमाणे याच गोष्टींचे अनुकरण करत गेले. प्रत्येक भवन किंवा योजना यांचे नामकरण ‘नेहरू’ किंवा ‘इंदिरा’ असे करण्याचे पारितोषिक त्यांना ठाऊक होते. अकादमी, आयोग, न्यास यांमध्ये पद आणि परस्पर सहकार्याने पक्षाच्या ‘प्रगतीशील’ लोकांचे जीवन सुखाने चालू होते. मग देशाची बौद्धिक क्षमता रसातळाला गेली तरी चालेल. त्यांना याची चिंता नव्हती. रशियाच्या साम्यवादी पक्षाप्रमाणे त्यांना याची चिंता नव्हती किंवा त्यांना याचे भान नव्हते; परंतु रशियाच्या संदर्भात परिणाम तोच झाला; परंतु जर आपण भारतीय जागे झालो नाही, तर काही गोष्टींमध्ये आपली अशीच वाईट स्थिती होऊ शकते. केवळ आर्थिक विकास कोणत्याही देशाच्या सामाजिक स्वास्थाची खात्री नाही, हे केवळ सोव्हिएत संघाच्या उदाहरणावरून नव्हे, तर आज युरोप, अमेरिका यांच्या उदाहरणावरूनही लक्षात येईल. विचित्र प्रकारच्या साम्यवादी बौद्धिकतेच्या रोगाने त्यांच्या सामाजिक व्यवस्थेला गोंधळात टाकले आहे.
भारतातही या साम्यवादी मानसिकतेची मुळे पसरत आहेत. नेहरूवाद्यांचे वर्चस्व होते, तेव्हापासून भारतात प्रगतीवादाच्या नावावर प्रत्येक प्रकारचे विषम सिद्धांत आणि मानसिकता यांना वेगवेगळ्या विदेशी ‘एजन्सी’ प्रोत्साहन देत राहिल्या होत्या. आता याच साम्यवादी मानसिकतेला प्रोत्साहन देत आंतरराष्ट्रीय इस्लामी राजनीती, त्याच्या हक्कांच्या संघटना आणि मिशनरी संघटना चातुर्याने स्वतःच्या स्वार्थाचे पोषण करत आहेत. ते मुसलमान देश आणि समाज यांमध्ये या प्रकारचा निधर्मीवाद, अल्पसंख्यांकवाद इत्यादींना प्राधान्य देत नाही; परंतु आपल्याला या गोष्टींना महत्त्व देण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. असे का?
११. हिंदूच्या विरोधात युक्ती वापरून हिंदूंना न्यून लेखण्याचा साम्यवाद्यांचा प्रयत्न
केवळ यासाठी ते आम्हाला विचारांचे दास बनवून ठेवून आपला मूर्खपणा चालू ठेवू शकतात. या कार्यात त्यांना भारतामध्ये स्थापन झालेल्या पारंपरिक नेहरूवादी विचारसरणी, पैसा आणि मोठमोठ्या व्यक्ती त्यांच्या चुकीच्या कामांसाठी (मिशनरी किंवा तबलिगी यांचे संघटित धर्मांतर चालू ठेवणे) भक्कम संरक्षण देतात. जे लोक धर्मांतराला विरोध करत आहेत, ते ‘हिंदु पुनरुत्थानवादी आहेत’ किंवा ते ‘मागच्या काळातील मानसिकता’ असणारे आहेत, ते ‘प्रगतीच्या विरोधात आहेत’; तसेच ‘त्यांना गरीब जनतेच्या समस्यांची चिंता नाही’, ते ‘मिशनरी संघटनांचे सेवा कार्य पहात नाहीत’, ते ‘भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या विरोधात कार्य करत आहेत’, ते ‘समुदायांमध्ये भांडण लावत आहेत’ इत्यादी युक्तीवाद केले जातात. या युक्तीवाद करण्याच्या प्रणालीचा आधार घेऊन आंतरराष्ट्रीय इस्लामवादीही येथे जिहादी आतंकवादावर चिंता व्यक्त करणार्यांना कमी लेखतात; कारण येथे साम्यवादी नसलेल्या राजकीय विचारसरणींनी मार्क्सवाद, साम्यवादी सिद्धांत, इतिहास; इस्लामचा सिद्धांत आणि इतिहास अन् ख्रिस्त्यांचा सिद्धांत, इतिहास जाणण्याची किंवा समजून घेण्याची तसदीच घेतली नाही. त्यामुळेच भारतात नेहरूंची साम्यवादी विचारसरणी प्रभावी ठरत आहे; कारण शेवटी नेहरूवाद हा सर्व हिंदुविरोधी मतांचा साहाय्यक ठरला आहे.
१२. शब्दावली पालटून स्वतःचा हेतू साध्य करण्याचा साम्यवाद्यांचा प्रयत्न
त्याचप्रमाणे सोव्हिएत संघ आणि साम्यवादी सरकारे पडल्यानंतर मार्क्सवाद्यांनी स्वतःच्या शब्दावलीत पुष्कळ पालट केला आहे; मात्र त्यामागचा विचार जवळजवळ पूर्वीप्रमाणे आहे. आता साम्यवादी नेतेही मार्क्स आणि लेनिन यांचे प्रस्थापित शब्द वापरत नाहीत. त्या शब्दांच्या जागी त्यांनी भारताच्या सभ्यतेतील शत्रूंचे वाक्प्रचार उचलले आहेत. आता ते निधर्मीवाद, अल्पसंख्यांक अधिकार, मानवाधिकार, महिलांचे अधिकार, दलितवाद इत्यादी घोषणा देतात. या घोषणा हिंदु संस्कृतीला विभागण्यासाठी वापरल्या जात आहेत; म्हणून या शब्दांचा सर्वाधिक उपयोग, ख्रिस्ती मिशनरी, तबलिगी, इस्लामी राजकारणी आणि पाश्चात्त्य साम्राज्यवादी तंत्र करत आहेत.
१३. हिंदूंना विरोध करून इस्लामचे समर्थन करणारे साम्यवादी !
जरी आधीही साम्यवादी इस्लामला अनुकूल होते; परंतु सोव्हिएतचे विभाजन झाल्यानंतर हे प्रमाण वाढले आहे. केवळ भारतच नव्हे, तर अन्य अनेक देशांमध्ये साम्यवाद्यांनी आता स्वतःचे बळ इस्लामला समर्पित केले आहे. अधिक जाणून घेण्यासाठी ‘फ्रंटपेज मॅगझिन’चे मुख्य संपादक डेविड होरोवित्ज यांचे पुस्तक ‘अनहोली अलायन्स ः रॅडिकल इस्लाम अँड द अमेरिकन लेफ्ट’(२००६) यामधून माहिती घेता येऊ शकते. होरोवित्ज यांच्या ५० वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अंध अमेरिकेला विरोध करण्याच्या नावावर साम्यवादी पूर्वीही अयातुल्ला खामेनीसारख्या इस्लामी हुकूमशाहचे समर्थन करत होते. आता त्यांचे तेच एकमात्र धोरण आहे आणि यासाठी ते हुरियतपासून एर्दाेगॉनपर्यंत प्रत्येक प्रकारच्या देशी-विदेशी इस्लामवाद्यांच्या बाजूने बोलतांना दिसतात.
यासाठी आज हिंदु संस्कृतीचे रणनैतिक शत्रू ज्या तीव्रतेने हिंदु समाजाच्या विरुद्ध तिरस्कार पसरवत आहेत आणि तितक्याच सहजतेने भारतातील प्रत्येक प्रकारचे साम्यवादी, निधर्मीवादी यांना वेगवेगळ्या पद्धतीने पुरस्कृत करून त्यांचा सन्मान करत आहेत. स्वतःचर आंतरराष्ट्रीय कूटनीती, साधने आणि आर्थिक बळ त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून आणि त्यांचा प्रचार करून त्यांचे वरचे स्थान कायम ठेवत आहेत. जरी सर्व निधर्मी साम्यवाद्यांना हे समजत नसेल; परंतु हिंदु भारताविरुद्ध ही अघोषित मोर्चेबंदी आहे.
(समाप्त)
लेखक : प्रा. शंकर शरण, नवी देहली
संपादकीय भूमिकासाम्यवादी मानसिकतेवर आघात करण्यासाठी सरकारने भारतीय ज्ञान, परंपरा यांच्यावर आधारित धोरणांचे अनुकरण केले पाहिजे ! |
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !