भारतातील साम्यवाद्यांची भूमिका : काल आणि आज

मार्क्स लेनिनवाद या विचारसरणीने जवळजवळ संपूर्ण २० व्या शतकात जगावर परिणाम केला. मुख्यतः मार्क्सवाद्यांनाच ‘साम्यवादी’, म्हणजेच ‘डावे’ म्हटले जाते. मार्क्सवाद्यांविना अन्य साम्यवादीही मार्क्सवादी तत्त्वांचा अंगीकार करतात. या मार्क्स-लेनिनवादाची कथा रोमहर्षक आहे. वर्ष १९४३ ते १९५६ या कालावधीत अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक हावर्ड फास्ट हे तेथील साम्यवादी पक्षाचे सक्रीय नेते होते. त्यांनी ‘द नेकेड गॉड : द रायटर अँड द कम्युनिस्ट पार्टी’ या त्यांच्या पुस्तकात ‘साम्यवादाच्या भयंकर शोकांतिकेला केवळ साहित्याच्या भाषेतच सांगितले जाऊ शकते. त्याला व्यक्त करायला सामान्य भाषा किंवा समाज विज्ञानाचा शब्दसमूह असमर्थ ठरतो’, असे म्हटले आहे.

१. साम्यवादाचे खरे स्वरूप उघड करणारे रशियातील लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन

हावर्ड फास्ट यांची ही गोष्ट व्यवहारातही खरी ठरली. त्यानंतर १६ वर्षांनी रशियातील लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन यांचे ‘द गुलाग आर्किपेलागो’ हे पुस्तक जगासमोर आले. या लेखकाने साम्यवादाचे विडंबनात्मक स्वरूप समोर उतरवले. त्यांच्याप्रमाणे कुणी लेखन करू शकले नाही. यासाठी या पुस्तकाला ‘२० व्या शतकातील सर्वांत महान सत्य (नॉन-फिक्शन) ग्रंथ’ मानला गेला.

प्रा. शंकर शरण

साम्यवादाला पूर्णपणे समजून घेण्यासाठी या पुस्तकाला पर्याय नाही. वस्तूतः साम्यवादाच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक समीक्षेचे असंख्य पक्ष आहेत. त्यानंतर विविध देशांच्या संदर्भात अन्य असंख्य विश्लेषणे असण्याची शक्यता आहे. जागेच्या अभावी त्या सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही; म्हणून केवळ भारताच्या संदर्भात काही समान गोष्टी सांगितल्या आहेत. (ज्यांना अजून जाणून घेण्यामध्ये रस आहे, ते या लेखकाची ‘बुद्धीजीवियों की अफीम’, वाग्देवी प्रकाशन, बिकानेर आणि ‘भारत पर कार्ल मार्क्स और मार्क्सवादी इतिहास लेखन’, अक्षय प्रकाशन, देहली ही पुस्तके वाचू शकतात.)

२. दडपशाही आणि सत्तेचा क्रूर वापर करणार्‍या साम्यवादाला ‘मानवतावाद’ म्हणणे म्हणजे मूर्खपणा !

२० व्या शतकात जवळजवळ ३० देश, म्हणजे एका वेळी जगातील अर्ध्या क्षेत्रफळामध्ये साम्यवाद्यांची सत्ता होती. आता मुख्यतः २ देशांमध्ये साम्यवादी सत्ता आहे; परंतु तिथेही साम्यवादी अर्थव्यवस्था तुटलेली आहे. एकंदर पहाता सर्व साम्यवादी देशांमध्ये एक गोष्ट समान राहिली. ती म्हणजे सर्वाधिकार विचारसरणीची दडपशाही आणि सत्तेचा क्रूर वापर ! वैज्ञानिक सिद्धांत आणि बौद्धिकता यांचे अनेक दावे असले, तरी साम्यवादी कोणत्याही देशात एका क्षणासाठीही केवळ विचार अन् तर्क यांच्या आधारावर बहुसंख्य जनतेला स्वतःच्या बाजूने करण्यात यशस्वी झालेले नाहीत.

साम्यवादी देशांमध्ये कोणत्याही किमतीवर सत्ता कह्यात ठेवणे सर्वांत महत्त्वपूर्ण समजले गेले. यामागे काय कारण होते ? असा प्रश्न निर्माण होतो. एवढे की, त्यासाठी न संपणारे, अमानवीय बीभत्स अत्याचार केले गेले आणि नैतिकतेच्या सामान्य सार्वभौमिक तत्त्वांनाही तिलांजली दिली गेली. याचे उत्तर आहे की, तीच एकमेव कृती होती, ज्याने साम्यवादी त्यांचे विचार समाजावर लादू शकत होते. यासाठी हावर्ड फास्ट याने जगातील साम्यवादी आंदोलने, नेते यांच्याविषयीच्या प्रदीर्घ आणि प्रत्यक्ष अनुभवांतून हा रोमहर्षक निष्कर्ष काढला होता. त्याने म्हटले आहे, ‘‘साम्यवादी पक्ष आणि त्यांनी सिद्ध केलेली संघटनात्मक, सामाजिक अन् राजकीय व्यवस्था हे असे यंत्र आहे की, ज्यामध्ये मुख्यतः सर्वांत चांगले लोक प्रवेश करतात; परंतु नंतर ते सर्वांत वाईट लोकांमध्ये पालटले जातात.’’ म्हणूनच २० व्या शतकातील संपूर्ण प्रामाणिक अनुभवानंतर ‘मार्क्सवादी-लेनिनवादी साम्यवाद व्यापक मानवतावादाचे रूप होते’, असे मानणे मूर्खपणा होईल.

मार्क्सवादी-लेनिनवादी साम्यवाद

प्रत्यक्षात पूर्ण इतिहास आरंभीच दाखवतो की, ज्या देशांमध्ये साम्यवाद्यांची सत्ता होती, त्या वेळी त्यांनी केवळ आपल्या देशातील लोकांवर भयंकर अत्याचार केले. साम्यवादाचे घोषित केलेले लक्ष्य काहीही असो; परंतु नाझीवादाप्रमाणे हाही मानवतेच्या अनेक वर्गांना जगण्यासाठी लायक मानत नव्हता. त्यामुळे वर्ग सिद्धांत मानणारे किंवा लेनिन, स्टॅलिन, माओ यांचे पूजक यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. हे सर्व कोणत्या ना कोणत्या पद्धतीने समाजात फूट पाडण्याच्या आधारावर स्वतःची राजनीती सिद्ध करतात.

३. भारतीय राजकारणातील वर्चस्व असणारा मार्क्सवादाचा प्रभाव असलेला नेहरूवाद

आज काही लोक साम्यवादी इतिहासातील काळ्या पानांना ‘घडून गेलेल्या गोष्टी’ असे म्हणून त्याविषयी विचारण्यास घाबरतात; परंतु त्या गोष्टी भारतात अजूनही तशाच आहेत. येथे असलेली राजनैतिक-वैचारिक परंपरा नेहरूवाद म्हटल्या जाणार्‍या विचारसरणीवर आधारित आहे. नेहरूवादावर सोव्हिएत मार्क्सवादाचा खोलवर असलेला प्रभाव जगजाहीर आहे. आजही भारतीय राजकारणामध्ये नेहरूवाद सर्वांत प्रभावी विचार आहे. देश-विदेशातील अनेक समस्यांवर आपले बहुतांश नेते, सत्ताधारी आणि विचारवंत याच प्रभावाखाली लिहितात, बोलतात आणि धोरणे सिद्ध करतात. काळानुसार काही शब्द, वाक्प्रचार पालटले आहेत; परंतु भारतीय धर्म-परंपराविषयी दुरावा आणि पाश्चिमात्य विचारांविषयी आग्रह आहे तसाच आहे. यामध्ये असे काही जण आहेत, जे नेहरूंची निंदा करणारे असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्यांच्याच विचारांनुसार वागत आहेत.

मार्क्सवादाचा प्रभाव असलेला नेहरूवाद

४. समाजातील विविध घटकांवर असलेला नेहरूवादाचा प्रभाव

यासाठी विविध कारणांमुळे भारतात मार्क्सवादी विचारसरणी आणि मानसिकता हा भूतकाळ नाही, तर या काळातील विडंबन आहे. नव्या पिढीला आजही अनेक खोट्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. उदा. प्रत्यक्ष रशियामध्ये आता कुठे नोव्हेंबर १९१७ मधील घटनेला ‘साम्यवाद्यांद्वारे केलेला सत्तापालट’ म्हटले जात आहे; परंतु भारतातील विविध लेखक आणि नेते ज्यांचे शिक्षणपद्धतीवर वर्चस्व आहे, ते आजही ‘समाजवादी क्रांती’ आणि ‘समाजवादी लोकतंत्र’ म्हणून रशियातील साम्यवादाची स्तुती करत आहेत. वेगवेगळ्या प्रसंगामध्ये , वेगवेगळी कारणे सांगून चातुर्याने शाळा-महाविद्यालयांतील शिक्षणासह विश्वविद्यालये, प्रसारमाध्यमे आणि अन्वेषण करणार्‍या संस्थांपर्यंत साम्यवादी प्रचारक अन् त्यांच्या प्रचारामुळे प्रभावित शिक्षक, पत्रकार यांनी सर्व विषयांचे राजकारण केले आहे.

काही लोक ‘खरोखर दीर्घकाळापासून चालत आलेली परंपरा’ किंवा ‘चांगला उद्देश’ या नावावर साम्यवादाच्या विकृत शिक्षणाचा बचाव करतात. ‘हे कारण शैक्षणिक नाही, तर राजनैतिक आहे’ याचा पुरावा आहे. यामुळे आपल्या नवीन पिढ्यांच्या वैचारिक क्षमतेची जी हानी होत आहे, हा चिंतेचा विषय झाला पाहिजे. नाही तर आपण सोव्हिएत संघाच्या शेवटच्या दशकातील रशियाचे बौद्धिक जडत्व आणि दूरवस्था या स्थितीमध्येच राहू. याची जाणीव आपल्याला होवो किंवा न होवो.

५. साम्यवाद शिकवणार्‍या भारतातील शाळा आणि महाविद्यालये

या बौद्धिक जडत्वामुळे इतिहासामध्ये कचरापेटीत गेलेला साम्यवाद-समाजवाद आजही आपल्या शाळा, महाविद्यालये आणि विश्वविद्यालयांतील अभ्यासक्रमाची शोभा वाढवत आहे; परंतु भारत अन् संपूर्ण जगाला दशकांपासून संकटात टाकणार्‍या इस्लामी आतंकवादाचे अध्ययन आणि अध्यापन होत नाही. ‘आंतरराष्ट्रीय जिहाद कारखाना’ म्हटले जाणारे मदरसे पाकिस्तानमध्ये चर्चा करण्याचे, धोरणे ठरवण्याचे आणि निर्णय घेण्याचे विषय होऊ शकतात; परंतु भारतात हा संपूर्ण विषयच वर्ज्य आहे. भारतात राजनीतीशास्त्र शिकणारा विद्यार्थी ‘जिहादी आतंकवादा’विषयी काही जाणू शकत नाही; परंतु त्याला रशिया, चीन आणि समाजवादी इतिहासाविषयी अनेक खोट्या गोष्टींचा अभ्यास करण्यास बाध्य केले जाते. या शिक्षणामध्ये साम्यवादी राजकीय गोष्टींना प्रोत्साहन देऊन नव्या पिढीची बौद्धिक हानी करायची आहे. दुर्भाग्याचे म्हणजे याविषयी भारतातील साम्यवादी नसलेली राजकीय विचारसरणीही उदासीन आहे.

६. पक्षाचा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरीतील अब्जावधी रुपये व्यय करणारे भारतातील शासन !

सध्याची देशातील राजकीय परंपरा साम्यवादी मानसिकतेने ग्रासलेली असल्यानेच भारतात हे शक्य होत आहे. नेत्यांच्या जन्म-मृत्यूदिनांवर आणि वेगवेगळ्या कारणांनी वर्तमानपत्रांमध्ये नेत्यांची छायाचित्रे छापून पक्षाचा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरीतील अब्जावधी रुपये प्रतिवर्षी व्यय केले जातात. एखाद्या पक्षासाठी स्रोतांचा असा नाश कोणत्याही गैरसाम्यवादी देशात होत नाही. सार्वजनिक पैसा वापरून लोकांच्या तोंडी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांची महानता बळजोरीने लादणे, ही पश्चिमी भांडवलशाही नाही; तर रशिया-चीन साम्यवादी आजार आहे, जो भारतातील जवळजवळ सर्वच पक्षांनी अवलंबला आहे.

 (क्रमशः उद्याच्या दैनिकात)

लेखक : प्रा. शंकर शरण, नवी देहली


लेखाचा पुढचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/953645.html