१. ‘होर्डिंग’ लावण्यासाठी सक्षम युवक मिळणे आणि त्यांनी नेहमीपेक्षा अर्ध्या शुल्कात काम करणे

‘महाकुंभ पर्वकाळात कुंभक्षेत्री ‘होर्डिंग’ लावण्याच्या दृष्टीने सक्षम व्यक्ती न मिळाल्याने पुष्कळ अडचणी येत होत्या. ही शारीरिक सेवा बहुतांशी रात्रीच्या वेळी कडाक्याच्या थंडीतच करावी लागते. ज्या व्यक्तीला हे काम दिले होते, तिने कामाचा आरंभ केल्यानंतर ते पुढे चालू ठेवण्यास असमर्थता दर्शवली. अशा स्थितीत गुरुकृपेने कुंभक्षेत्री ‘होर्डिंग’ लावण्यासाठी आम्हाला एक तरुण मिळाला. त्याच्या समवेत अन्य २ तरुणही होते. त्यांनी ही सेवा करण्याची सिद्धता दाखवली. त्यानंतर हे तीनही युवक ३ आठवडे साधकांच्या समवेत तंबूत राहिले आणि त्यांनी मन लावून ‘होर्डिंग’ लावण्याची सेवा केली. त्यांनी प्रदर्शनांसाठी कमानी लावण्याची सेवाही केली. त्यांनी या कामासाठी समाजात जेवढे शुल्क आकारले जाते, त्याच्या अर्धे शुल्क घेऊन हे काम पूर्ण केले.
२. ‘फ्लेक्स’ आणि अन्य प्रकारची छपाईची कामे वेळेत अन् गुणवत्तापूर्ण होण्यासाठी योग्य व्यक्ती मिळणे
महाकुंभमेळ्याच्या कालावधीत स्थानिक पातळीवर ‘फ्लेक्स’ आणि अन्य प्रकारची छपाईची कामे वेळेत अन् गुणवत्तापूर्ण होण्यासाठी योग्य व्यक्ती मिळणे आवश्यक होते. या सेवेसाठी आमचा श्री. सर्वेश नावाच्या व्यक्तीशी संपर्क झाला. त्यांच्याशी बोलतांना समजले की, ते ‘हार्टफुलनेस’या संस्थेचे साधक आहेत. ते साधक असल्याने आम्हाला त्यांच्याशी समन्वय करणे सोपे झाले. समाजातील अन्य व्यक्तींच्या तुलनेत श्री. सर्वेश यांच्याकडून हे कार्य करून घेण्यासाठी आम्हाला चांगले सहकार्य मिळाले. श्री. सर्वेश यांच्यात साधकत्व असल्याने त्यांचे वागणे सात्त्विक आणि विश्वासार्ह होते. आमच्या समयमर्यादेचे भान ठेवून ते आम्हाला आवश्यक असलेले साहित्य सिद्ध करून देण्याचे नियोजन करत. अनेकदा ते मध्यरात्री कडाक्याच्या थंडीत येऊन आम्हाला आवश्यक असलेले साहित्य पुरवत होते. कुंभमेळ्याच्या कालावधीत छपाईचे शुल्क वाढले होते; परंतु त्यांनी आम्हाला आरंभी ठरलेल्या मूल्यात काम पूर्ण करून दिले. ‘वेळेवर अशी व्यक्ती मिळणे’, हीसुद्धा गुरुकृपाच होती.
३. विद्युत्जोडणीत कुशल असणारे साधक वेळोवेळी सेवेसाठी येत राहिल्यामुळे त्या सेवेत शेवटपर्यंत कुठलीही अडचण न येणे
कुंभमेळ्यात ४ विविध ठिकाणी प्रदर्शने लागणार होती. त्यांतील विद्युत्जोडणीची सेवा महत्त्वाची असल्याने आम्हाला यासाठी एका पूर्णवेळ तज्ञ साधकाची आवश्यकता होती. या सेवेसाठी पूर्णवेळ साधकांची नोंदणी झाली नव्हती. या सेवेसाठी विद्युत् सेवेत कुशल असणारे आणि ही सेवा करण्याची क्षमता असलेले साधक वेळोवेळी सेवेसाठी येत राहिले आणि शेवटपर्यंत आम्हाला कुठलीही अडचण आली नाही.
४. ‘प्लंबिंग’च्या सेवेत साधकांचे साहाय्य मिळणे
आरंभीच्या काळात जेव्हा प्रदर्शन आणि निवासव्यवस्था यांची उभारणी केली जात होती, तेव्हा ‘प्लंबिंग’ची सेवा करणारे साधक आले होते. त्यामुळे ‘प्रदर्शनस्थळावरील जलवाहिनी बसवणे, ‘बेसिन’ बसवणे, प्रसाधनगृहाची रचना करणे’ इत्यादी सेवांसाठी आम्हाला साधकांचे साहाय्य मिळाले.
५. भंगाराच्या साहित्याची विक्री करण्यात मोलाचे साहाय्य मिळणे
कुंभमेळ्याच्या समाप्तीच्या वेळी आम्हाला अनेक प्रकारचे भंगाराचे साहित्य विकायचे होते. कुंभक्षेत्री ही सेवा चांगल्या प्रकारे होणे आवश्यक असते. अशा वेळी प्रयाग येथील एक सद्गृहस्थ श्री. कौशलेंद्र पांडे यांच्याशी आमची ओळख झाली. भंगाराच्या साहित्याची विक्री करण्यात आम्हाला त्यांचे मोलाचे साहाय्य मिळाले.
६. एका साबणाच्या आस्थापनाने साबण विनामूल्य देणे
कुंभमेळ्यात एका साबणाच्या आस्थापनाने प्रत्येक आध्यात्मिक संस्थेसाठी ४०० साबण विनामूल्य देण्याचे विशेष अभियान चालवले होते. त्यांनी आपले कार्य समजून घेतले आणि त्यांच्या आस्थापनाच्या वतीने आम्हाला ६,२०० साबण विनामूल्य दिले. ‘केवळ गुरुकृपेनेच आम्ही हे अनुभवू शकलो. गुरुकृपेमुळेच या सर्व सेवा व्यवस्थित पूर्ण होऊ शकल्या’, याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ, वाराणसी, उत्तरप्रदेश. (१९.६.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर मिळेपर्यंत तो प्रश्न, तसेच पुढे ते उत्तरही काही घंट्यांत विसरून जाणे’, यांमागील कारणे
पत्नीच्या मेंदूच्या शस्त्रकर्माच्या वेळी साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिकेने अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती