
१. चारचाकी गाडीने जात असतांना दृष्टी आकाशाकडे गेल्यावर एक अद्भुत दृश्य दिसणे आणि ढगांमधून सूर्याची किरणे प्रक्षेपित होत असतांना त्यात मारुतिरायाचे दर्शन होणे अन् मनाला वेगळाच आनंद जाणवणे
‘२.४.२०२६ या दिवशी हनुमान जयंती होती. संध्याकाळी ५.२० वाजता मी फोंड्याहून मडगावच्या (गोवा) दिशेने चारचाकी गाडीने जात होतो. त्या दिवशी पावसाळी वातावरण होते. मी बोरी (गोवा) येथे पोचत असतांना माझी दृष्टी सहज आकाशाकडे गेली. तेव्हा मला आकाशात एक अद्भुत दृश्य दिसू लागले. ढगांमधून सूर्याची किरणे प्रक्षेपित होत होती आणि त्यामधून मला श्री मारुतिरायाचे दर्शन होऊ लागले. त्या वेळी माझ्या मनाला वेगळाच आनंद आणि उत्साह जाणवत होता. मी गाडी चालवत असूनही माझे लक्ष केवळ त्या अद्भुत दृश्याकडे खिळून होते.
२. ढगांमध्ये दिसणार्या मारुतिरायाची भ्रमणभाषमध्ये छायाचित्रे काढणे आणि त्या छायाचित्रातील दृश्य पाहून ‘श्री मारुतिराया येणार्या आपत्काळात साधकांचे रक्षण अन् वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी प्रगट होत आहेत’, असे जाणवणे

मी माझी चारचाकी गाडी बाजूला घेतली आणि ढगांमध्ये दिसणार्या मारुतिरायाची भ्रमणभाषमध्ये छायाचित्रे काढली. तेवढ्यात सूर्याचे किरण अधिक पसरू लागले आणि मला त्याकडे पहाणे कठीण होऊ लागले. मी काढलेली छायाचित्रे पाहिल्यावर त्यात श्री मारुतिरायांचा चेहरा दिसत होता. डोक्यावर मुकुट आणि त्यांच्या तोंडाकडे सूर्य दिसत होता. हे दृश्य पाहून माझ्या मनात ‘श्री मारुतिराया येणार्या आपत्काळात साधकांचे रक्षण आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी प्रगट होत आहे’, असा विचार आला.
‘हे मारुतिराया, येणार्या आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण होऊ दे. साधकांमध्ये दास्यभाव आणि भक्ती वृद्धींगत होऊन आम्हाला श्रीरामस्वरूप गुरुदेवांची सेवा अन् भक्ती करता येऊ दे आणि रामराज्याची स्थापना लवकर होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला आलेली अनुभूती मी त्यांच्या चरणी अर्पण करतो.’
– श्री. संगम प्रफुल्ल बोरकर, मडगाव, गोवा. (३.४.२०२६)
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे