
प्रश्न :
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘मी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सतत प्रश्न का विचारतो ? मला एवढी जिज्ञासा का आहे ? माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याने मला तात्कालिक आनंद होतो. उत्तर मिळेपर्यंत मी तो प्रश्न विसरूनही गेलेलो असतो आणि उत्तर मिळाल्यावर ते उत्तरही काही घंट्यांत विसरून जातो’, यांचे कारण काय ?
उत्तर :
श्री. राम होनप :
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील समष्टीप्रती असलेल्या प्रीतीमुळे त्यांनी समष्टीचे शंकानिरसन होण्यासाठी ज्ञानकार्य हाती घेतले असणे

‘सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत समाज सात्त्विक होता. त्या काळी बहुतांश लोकांमध्ये ईश्वराप्रती भाव आणि श्रद्धा होती. त्यामुळे त्यांच्या मनात अध्यात्माविषयी फारसे प्रश्न नसत. कलियुगात, विशेषतः या विज्ञानयुगात लोकांचे साधना करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांच्यातील भाव आणि श्रद्धा न्यून होऊन त्यांचे मन अन् बुद्धी यांचे कार्य वाढले आहे. परिणामी अनेकांच्या मनात अध्यात्माविषयी विविध प्रश्न निर्माण होतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन धर्म आणि अध्यात्म यांच्या संबंधीच्या ज्ञानाचे महत्त्व जाणले आहे. सध्याच्या काळात जिज्ञासू आणि साधक यांच्या मनात ‘अध्यात्मात असे का सांगितले आहे ? त्यामागील अध्यात्मशास्त्र काय आहे ?’, असे असंख्य प्रश्न येतात. त्यांची उत्तरे विविध ग्रंथांमध्ये नाहीत. जिज्ञासू आणि साधक यांना समर्पक आणि अध्यात्मशास्त्रावर आधारित उत्तरे मिळाल्यास त्यांची साधना आणखी चांगली होणार आहे अन् त्यांचा ईश्वराप्रतीचा भाव आणि श्रद्धा वृद्धींगत होणार आहे, हे जाणून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर अध्यात्मातील विविध विषयांवरील प्रश्न सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारतात. गुरुकृपेमुळे त्या साधकांना त्या प्रश्नांची उत्तरे सूक्ष्मातून मिळतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे सर्वांवर निरपेक्ष प्रेम असल्याने त्यांनी हे ज्ञानकार्य हाती घेतले आहे.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी कार्याप्रती असलेली तीव्र तळमळ !
‘अध्यात्मातील विविध विषयांचे अधिकाधिक ज्ञान जिज्ञासू अणि साधक यांच्यापर्यंत पोचावे’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सतत प्रश्न विचारतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची प्राणशक्ती अल्प असून त्यांना पुष्कळ थकवा असतो. असे असूनही ते सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान पडताळतात; कारण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमध्ये समष्टी कार्याची तीव्र तळमळ आहे.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अंतर्ज्ञानाद्वारे अध्यात्मातील विविध प्रश्नांची निवड करता येणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ‘जिज्ञासू आणि साधक यांच्या मनातील प्रश्न, तसेच पुढच्या िपढ्यांतील साधकांना साधना करतांना कोणते प्रश्न पडू शकतात ? , हे अंतर्ज्ञानाने समजते. अशा प्रश्नांची निवड करून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर ते प्रश्न सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारतात.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याने तात्कालिक आनंद होण्याचे कारण
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेल्या ज्ञानाद्वारे मिळते. तेव्हा ‘एक समष्टी कार्य पूर्ण झाले’, या विचाराने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना तात्कालिक आनंद होतो.
५. सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाकडून प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले तो प्रश्न विसरून जाण्याचे कारण
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधना आणि भक्ती यांद्वारे ईश्वरप्राप्ती साध्य केली आहे. ईश्वर सर्वज्ञानी असतो. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना आता जाणून घेण्यासारखे काही शेष नाही. त्यामुळे त्यांना स्वतःचे काही प्रश्न नाहीत. ते बहुतेक वेळा निर्विचार अवस्थेत असतात. त्यांना काळानुरूप अंतर्ज्ञानाद्वारे जिज्ञासू आणि साधक यांच्या मनातील प्रश्न समजतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ते प्रश्न उत्तर मिळवण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना दिले की, पुन्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर निर्विचार अवस्थेत जातात. त्यामुळे जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर एखादा प्रश्न सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाला विचारतात, तेव्हा त्याचे उत्तर मिळेपर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर तो प्रश्न विसरून गेलेले असतात.
६. साधकाला सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे प्राप्त झालेले उत्तर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले काही घंट्यांनी विसरून जाणाचे कारण
सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाला सूक्ष्मातून ज्ञानाद्वारे मिळालेले उत्तर वाचल्यावर त्याचा परिणाम सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांच्यावर काही घंटे टिकतो. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची पुन्हा निर्विचार स्थिती होते आणि ईश्वरी प्रेरणेनुसार त्यांच्या पुढच्या कार्याला प्रारंभ होतो. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर काही घंट्यांनी ते उत्तर विसरून जातात.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १२.१.२०२६, वेळ : सकाळी १०.३० आणि कालावधी : २० सेकंद)
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ