भाषणाद्वारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची प्रशासनाने व्यक्त केली भीती !

मंगळुरू (कर्नाटक) : राज्यातील हावेरी शहरात असलेल्या हुक्केरी मठ परिसरात ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत एका अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात १ सप्टेंबरला कार्यक्रमाच्या पूर्वसिद्धतेची पहाणी करण्यासाठी आणि १४ सप्टेंबरला समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक येणार होते; परंतु ‘गौरी-गणेश’ आणि ‘ईद-ए-मिलाद’ हे सण जवळ असल्याचे अन् मुतालिक यांच्या भाषणाने शांतता अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे कारण देत त्यांना हावेरी जिल्हाबंदी करण्यात आली. धार्मिक सलोखा आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर अशा २७ दिवसांसाठी मुतालिक यांना हावेरी जिल्ह्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले आहे.
🚫🇮🇳 Karnataka: Ban on Pramod Mutalik!
✋ Shri Ram Sena’s National President Pramod Mutalik (@PramodMuta39880) barred from entering Haveri district.
⚠️ Admin fears his speech may cause “law & order” issues.
🤔 Is this India or Pakistan, where bans are only on staunch Hindu… pic.twitter.com/TacTUd5VPr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 2, 2025
राज्य सरकारला माझी इतकी भीती का वाटते ? – प्रमोद मुतालिक
यासंदर्भात बोलतांना श्री. मुतालिक म्हणाले की,

श्रीराम सेनेच्या अभ्यासवर्गाच्या निमित्ताने मला हावेरी जिल्ह्याला भेट द्यायची होती; पण राज्यातील हिंदुविरोधी सरकारने मला एक महिन्यासाठी हावेरी जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. राज्य सरकारला माझी इतकी भीती का वाटते ?, हे मला समजत नाही. मी या बंदीला कायद्याद्वारे आव्हान देईन.
![]() |
![]() |
वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा – (प्रशासनाची आदेशप्रत कन्नडमध्ये आहे)
संपादकीय भूमिका
|


लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !