हिंदूंच्या देवतांविषयी करण्यात येत होती आक्षेपार्ह वक्तव्ये
दुर्ग (छत्तीसगड) – येथील बोरसी येथील न्यू मन्नम नगर परिसरात एका घरात चालू असलेल्या प्रार्थनासभेत कामगारांचे बलपूर्वक धर्मांतर केले जात असल्याचे उघड झाले. हिंदु संघटनांनी हा प्रकार उघड केला. यानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोचले आणि त्यांनी मनोहर तांडी अन् आकाश बसेरा या २ पाद्र्यांना अटक केली. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हिंदु संघटनांच्या म्हणण्यानुसार ओडिशाहून आलेल्या कामगारांना अन्न आणि औषधोपचार यांचे आमिष दाखवून प्रार्थनासभेत नेण्यात आले. या वेळी हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात येत होती. यासह कामगारांवर दबाव आणून त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले जात होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर तहसीलदार प्रफुल्ल गुप्ता आणि पोलीस अधीक्षक सुखनंदन राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. पोलीस निरीक्षक राजेंद्र लहारे यांनी सांगितले की, धर्मांतराच्या तक्रारीनंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई चालू आहे. या प्रकारामुळे राज्यात धर्मांतरावरील नियंत्रणासंदर्भातील मागणीने पुन्हा जोर धरला आहे.
दोन वर्षांपासून चालू होती प्रार्थनासभा
स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात गेल्या दोन वर्षांपासून या प्रार्थनासभा चालू आहेत. पूर्वी विरोध झाल्यानंतर काही काळ त्या बंद करण्यात आल्या होत्या; मात्र नंतर पुन्हा चालू करण्यात आल्या. रविवार, ३१ ऑगस्टला झालेल्या प्रार्थनासभेला हिंदु संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
संपादकीय भूमिका
|

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court