तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे वादग्रस्त विधान !

कोलकाता (बंगाल) : राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे डोके कापावे आणि ते पटलावर ठेवून लोकांना दाखवावे. या वर्षाच्या आरंभीपासूनच मोदी सरकारने भारतात स्थायिक झालेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांना हाकलून लावण्यासाठी ‘ऑपरेशन पुशबॅक’ चालू केले होते. त्या पार्श्वभूमीवर मोईत्रा बोलत होत्या. घुसखोरांसाठी बंगाल हा सर्वांत सोपा मार्ग आहे, हे त्यांनी नाकारले.
🚨 “Cut off Amit Shah’s head & serve it on a platter!” – shocking remark by TMC MP Mahua Moitra.
Criticism is fine in democracy, but this hate-filled, violent language against the Union Home Minister is deplorable.
Shame that such a party rules a state!
PC: @epanchjanya pic.twitter.com/sMvDLIj6LR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 30, 2025
मोईत्रा पुढे म्हणाल्या…,
१. आपल्या सीमांचे रक्षण करणारे कुणी नाही का ? इतर देशांतील लाखो-कोटी लोक भारतात प्रवेश करत आहेत. जर ते आपल्या माता-भगिनींवर लक्ष ठेवून असतील, जर ते आपली भूमी कह्यात घेत असतील, तर सर्वप्रथम अमित शहा यांचे डोके कापून पटलावर ठेवावे.
"Amit Shah's head should be cut off and put on the table" – Mahua Moitra, Trinamool Congress MP pic.twitter.com/MeDsBNyiJy
— BJP West Bengal (@BJP4Bengal) August 29, 2025
२. बेकायदेशीर घुसखोरी न रोखणे, हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे.
३. स्थानिक लोक सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना घाबरतात. आम्हाला बंगालमध्ये कुणीही घुसखोरी करतांना दिसत नाही.
संपादकीय भूमिका
|
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !