|

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड राज्यात साधू-संत यांचा वेष घेऊन लोकांची फसवणूक करणार्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन कालनेमी’ चालू करण्यात आले आहे. या मोहिमेत आतापर्यंत एका बांगलादेशी घुसखोरासह ३०० हून अधिक भोंदू साधूंना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या आदेशानंतर मागील महिन्यात प्रारंभ झालेला हा उपक्रम राज्याची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख टिकवण्यासाठी राबवला जात आहे. आतापर्यंत ४ सहस्रांपेक्षा अधिक लोकांची पडताळणी करण्यात आली. त्यांपैकी ३०० हून अधिक जण भोंदू असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. डेहराडूनच्या सहसपूर येथे रुकन रकम उपाख्य शाह आलम नावाच्या बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली. तो साधूचा वेष घेऊन स्वतःची खरी ओळख लपवत होता.
🚨Operation Kaalnemi🚨
300 fake saints arrested in Uttarakhand ⛳
No one will be spared – Chief Minister Pushkar Singh Dhami
One Bangladeshi infiltrator also among those arrested
👉 Such fraudsters must be punished with rigorous spiritual practice, only then will it serve as… pic.twitter.com/8adGPDufbA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 28, 2025
डेहराडून येथे ८६५ जणांची पडताळणी करून ११३ जणांना पकडण्यात आले. हरिद्वार जिल्ह्यात २ सहस्र ३०१ लोकांची पडताळणी होऊन १६२ जणांना अटक झाली. उधमसिंह नगरमध्ये हा आकडा १७ आहे. राज्यातील इतर भागांतही ही मोहीम सातत्याने चालू आहे.
‘कालनेमी’चा पौराणिक संदर्भ
कालनेमी हा रावणाचा मामा मारीच याचा मुलगा होता. त्याने साधूचा वेश घेऊन हनुमानाला संजीवनी आणण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु हनुमानाने त्याचे खरे रूप ओळखून त्याचा वध केला. महाभारतात कालनेमीचा पुनर्जन्म कंसाच्या रूपाने झाला, ज्याचा वध भगवान श्रीकृष्णने केला.
कुणालाही सोडणार नाही ! – मुख्यमंत्री धामी
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की,
ऑपरेशन कालनेमि के तहत प्रदेशभर में भेष बदलकर समाज को गुमराह करने वालों पर लगातार करारा प्रहार किया जा रहा है। सनातन को बदनाम करने वाले किसी भी षड्यंत्रकारी को बख्शा नहीं जाएगा, सख्त कार्रवाई जारी है… pic.twitter.com/SxInvwSXTT
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) August 25, 2025
जसा कालनेमी साधूचा वेश धारण करून फसवणूक करत होता, तसेच आज अनेकजण साधू-संत बनून गुन्हे करत आहेत. देवभूमी उत्तराखंडात अशा फसव्या आणि धार्मिक भावना दुखावणार्यांना सोडले जाणार नाही. अधिकारी सातत्याने पडताळणी करत आहेत. सर्व संशयितांवर कारवाई पूर्ण होईपर्यंत ही मोहीम थांबणार नाही. याचे ध्येय केवळ गुन्हे थांबवणे नाही, तर उत्तराखंडाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा सुरक्षित ठेवणे, हे आहे.
संपादकीय भूमिकाअशा भोंदूंना कठोर साधना करण्याची शिक्षा दिली पाहिजे, तरच इतरांवर वचक बसेल ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !