मंडणगड (रत्नागिरी) येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाची आढावा बैठका संपन्न

मंडणगड (जिल्हा रत्नागिरी) – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंदिर संस्कृती रक्षणासाठी आयोजित मंडणगड तालुका मंदिर अधिवेशनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांत २ आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात आढावा बैठक झाली. बैठकीत देवरहाटी, वस्त्रसंहिता लागू करणे, धर्मशिक्षण, सामूहिक आरती आदी विषयांवर चर्चा झाली. पंचक्रोशीतील मंदिरांची एकत्रित बैठक घेण्याचे ठरवून त्याचे दायित्व विश्वस्तांनी स्वीकारले. या वेळी मंडणगडसह परिसरातील मंदिर विश्वस्तही सहभागी झाले होते. बैठकीनंतर देवस्थानाच्या भूमीविषयी ‘अँटी लँड ग्रॅबिंग कायदा’ (अँटी लँड ग्रॅबिंग कायदा म्हणजे भूमी कह्यात घेण्याच्या विरोधातील कायदा) लागू करण्याची मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
देव्हारे येथील आढावा बैठकीत हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक असल्याचे उपस्थितांचे मत !
ग्रामीण भागासाठी सायंकाळी ५ वाजता देव्हारे येथील पूर्व वाडी समाज मंदिरात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला देव्हारेचे माजी सरपंच श्री. सीताराम बैकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश भोवने, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संयोजक श्री. रमेश कडू, हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश गुजराथी आदींसह १७ विश्वस्त, धर्मप्रेमी उपस्थित होते. या बैठकीत हिंदूंचे होत असलेले धर्मांतर, हिंदूंच्या मंदिरांच्या भूमींमध्ये अन्य धर्मियांचे होत असलेले आक्रमण याविषयी विस्तृत चर्चा झाली. यातुन हिंदूंमध्ये जागृती करणे आणि हिंदूंच्या प्रभावी संघटनची आवश्यकता सगळ्यांच्या लक्षात आली. चर्चेत उपस्थितांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
विशेष नियोजन
१. चर्चेनंतर तालुक्यातील ५० गावे प्रसारासाठी निश्चित झाली.
२. ६ पंचक्रोशींत विभागणी करून त्याचे दायित्व उपस्थित विश्वस्तांनी घेतले.
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात