नवी देहली – ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ए.डी.आर्.) या स्वयंसेवी संस्थेच्या ताज्या अहवालानुसार देशातील ३० मुख्यमंत्र्यांपैकी १२ म्हणजे ४० टक्के मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी खटले नोंद आहेत. त्यांपैकी १० म्हणजे ३३ टक्के मुख्यमंत्र्यांवर खून करण्याचा प्रयत्न, अपहरण आणि लाचखोरी असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्यातही तेलंगाणाचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याविरुद्ध सर्वाधिक ८९ गुन्हे नोंद आहेत. नुकतेच केंद्र सरकारने लोकसभेत ३ विधेयके सादर केली आहेत. ज्या अंतर्गत गंभीर गुन्हेगारी आरोपांखाली ३० दिवसांसाठी अटक केलेले पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री पदावर रहाण्यास अपात्र ठरणार आहेत.
⚠️ Shocking but true: 12 of India’s 30 Chief Ministers face criminal cases – ADR report.
🟥 Telangana CM Revanth Reddy (Congress) tops the list with 89 cases!
Democracy must not be a safe haven for criminals.
Time to change the rules; leaders tainted with crime should have no… pic.twitter.com/rdcEQ8P0QC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 23, 2025
ए.डी.आर्.ने या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढण्यापूर्वी प्रविष्ट (दाखल) केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून ही माहिती एकत्र करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाजोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येक जण निरपराध असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेनुसार गुन्हे नोंद असणारे अशा पदांवर नियुक्त केले जाऊ शकतात. हा नियम पालटणे आता आवश्यक झाले आहे ! |

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !