रानभाज्या आणि रानमेवा यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा, रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयाने चालू केलेल्या या मालिकेत आज आपण आंबुशीची माहिती वाचणार आहोत.
(भाग २२)
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/948569.html
कफ आणि वात यांसाठी गुणकारी

याला आंबुटी, आंबाती, आंबटी, भुईसपटी आदी स्थानिक नावाने ओळखले जाते. आंबुशी गुणाने रूक्ष आणि उष्ण आहे. पचनास हलकी असून चांगली भूकवर्धक आहे. आंबुशीच्या अंगरसाने धमन्यांचे संकोचन होऊन रक्तस्राव बंद होतो. चामखीळ आणि नेत्रपटलाच्या अपारदर्शकतेत पानांचा रस बाह्य उपाय म्हणून वापरतात. ताज्या पानांची कढी पाचक आहे. आंबुशी वाटून सुजेवर बांधल्यास दाह न्यून होतो आणि सूज उतरते. धोतर्याचे विष चढल्यास आंबुशीचा रस उतारा म्हणून देतात. कफ आणि वात यांमध्ये आंबुशी गुणकारी आहे.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/949548.html
गरम शेक आणि गार शेक
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
‘ओव्हेरियन सिस्ट’ आणि आयुर्वेद
पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी
वर्षा ऋतूचर्या : पावसाळ्यात आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदाचे मार्गदर्शन !