प्रत्येक शनिवारी वाचा नवीन सदर !
देववाणी संस्कृतचे अद्वितीयत्व !

१. संस्कृत ही देवांची भाषा !
संस्कृत ही जगातील सर्वांत प्राचीन आणि आजही जिवंत असलेली भाषा आहे. सहस्रो वर्षांचा तिचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे. ती प्राचीन भारतातील विविध पंथांच्या पवित्र ग्रंथांत प्रकट झाली असून ती देवांची भाषा मानली जाते. ऋषिमुनींनी वेद, उपनिषदे, योगशास्त्रे आणि पुराणे यांच्या माध्यमातून ही भाषा पृथ्वीतलावर आणली. यातून त्या काळातील ज्ञात संस्कृती, भारतियांची क्रियाशीलता आणि आध्यात्मिक परंपरा स्पष्ट दिसतात.
२. ९० हून अधिक भाषांमध्ये संस्कृतोद्भव शब्द अस्तित्वात !
मुनीवर्य पाणिनीने सुमारे २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी संस्कृत व्याकरणाची पुनर्रचना करून ‘अष्टाध्यायी’ ग्रंथ लिहिला, जो आजही प्रमाणभूत मानला जातो. पाश्चिमात्य तज्ञ त्याचे मानवी प्रगल्भतेचे सर्वोच्च उदाहरण म्हणून कौतुक करतात. संशोधकांच्या मते संस्कृत ही भारतीय, युरोपीय, पर्शियन, कुर्दीश, आर्मेनियन भाषांची जननी आहे. ग्रीक, लॅटिन, अरेबिक यांसह ९० हून अधिक भाषांमध्ये संस्कृतोद्भव शब्द आहेत. इंग्रजीतील सुमारे २५ टक्के शब्द संस्कृतमधून आले आहेत.
३. जीवनातील सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारी जागतिक भाषा !
संस्कृतमध्ये काव्य, नाटक, तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित, वैद्यक, ललितकला अशा विविध विषयांचे विपुल वाङ्मय उपलब्ध आहे. कालिदास, बाणभट्ट, भारवी, भास्कराचार्य, चाणक्य, आद्यशंकराचार्य यांचे थोर कार्य यातून उभे राहिले. त्यामुळे संस्कृत केवळ धार्मिक भाषाच नाही, तर जीवनातील सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारी जागतिक भाषा आहे.
४. पाश्चात्त्यांना भुरळ पाडणारी भाषा !
रामायण, महाभारत, भगवद्गीता यांनी अनेकांना प्रेरित केले. जर्मन कवी गोथे, अभ्यासक मॅक्समुल्लर यांना या काव्यांची भुरळ पडली. न्यूयॉर्कमधील ‘मृच्छकटिकम्’ नाटकाच्या प्रयोगानंतर नाट्यतज्ञ जे. डब्ल्यू. क्रच यांनी संस्कृतच्या परिपूर्णतेचे कौतुक केले.
५. संस्कृत ब्रीदवाक्ये
अ. सार्वभौम भारत (सत्यमेव जयते ।) – सत्याचाच विजय होतो (भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य)
आ. योगक्षेमं वहाम्यहम् । (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक २२) – (माझे नित्य चिंतन करणार्या माणसांचा) भक्तांचा योगक्षेम मी स्वतः प्राप्त करून देतो (भारतीय एल्.आय.सी.)
इ. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय । – सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या निवारणासाठी (मुंबई पोलीस)
ई. वन्दे मातरम् । – राष्ट्रीय गीतातील संस्कृत ओळी
उ. ‘जलेष्वेव जयामहे ।’, म्हणजे ‘आम्ही समुद्रात (पाण्यात) विजयी होतो.’
६. भारतीय राज्यघटनेतील वेदांत तत्त्वज्ञान, योगशास्त्र, ध्यानधारणा, ताणतणाव नियंत्रण, वैद्यकशास्त्र अशा क्षेत्रांचे मूळ संस्कृत वाङ्मयात आहे. अमरकोश (इ.स. ६००) सारख्या ग्रंथांमुळे शब्दसंपत्ती समृद्ध झाली आहे.

७. संस्कृतचे महत्त्व
संस्कृतची अक्षरे आणि नाद मंत्ररूपात दैवी शक्ती देतात. तिचा उच्चार वाणी शुद्ध करतो. वर्णमाला, उच्चार, संधी, समास, मुक्त वाक्यरचना आणि शब्दनिर्मितीची क्षमता यांमुळे ही भाषा संगणक अन् नैसर्गिक भाषाप्रक्रियेसाठीही उपयुक्त आहे.
८. असा होत आहे संस्कृतचा प्रचार-प्रसार !
अ. ‘संस्कृत भारती’सारख्या संस्था जगभर भाषाप्रसार करतात. कर्नाटकातील मातूर आणि मध्यप्रदेशातील झिरी ही गावे पूर्णपणे संस्कृतमध्ये संभाषण करतात.
आ. ब्रिटीश शाळांमध्ये संस्कृत शिकवले जाते; कारण त्यामुळे गणित, विज्ञान आणि भाषाशिक्षण सुलभ होते.
इ. पाश्चिमात्य पॉप संगीतातही संस्कृतने प्रवेश केला असून त्यातून विश्वशांतीचा संदेश दिला जातो.
ई. अलीगढ आणि काश्मीर विद्यापीठ (युनिव्हर्सिटी), देहली, तमिळनाडू आणि बंगालच्या मदरशांत संस्कृत शिक्षण विभाग आहे.
उ. मुसलमान युवती शाजिना केरळ विद्यापिठातील ‘एम्.ए. (संस्कृत)’ (कला शाखेची पदव्युत्तर पदवी) परीक्षेत ७९ टक्के गुण मिळवून पहिली आली.
ऊ. सुप्रसिद्ध अर्थतज्ञ सी.डी. देशमुख यांसारख्या जुन्या व्यक्ती त्यांच्या मित्रमंडळींसह संस्कृतमधून पत्रव्यवहार करत असत.
ए. किमान डझनभर संस्कृत नियतकालिके प्रकाशित होतात. ‘ऑल इंडिया संस्कृत’ वार्ता प्रसारित होतात.
ऐ. वर्ष २००७ मध्ये पूर्वराष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे ॲथेन्स (ग्रीस) येथे गेले असतांना त्यांचे संस्कृतमध्ये स्वागत केले गेले.
संस्कृत भाषेला नामशेष करण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसवाले !

‘ब्रिटीश भारतात आल्यापासून संस्कृत भाषेच्या अधोगतीला सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात तिला ‘मृतभाषा’ म्हणून काँग्रेसने घोषित केले. त्यामुळे अध्यात्मासह व्याकरण, नाट्य, गणित, वास्तूशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादी सर्वच विषयांतील सर्वोच्च ज्ञानाला आपण मुकलो. शासनकर्त्यांनी संस्कृत न शिकवून आणि तिला ‘मृत ठरवून’ मराठी, तसेच इतर स्थानिक भाषांचा पायाच उद्ध्वस्त केला.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
९. संस्कृतच्या अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना !
अनेक देशांतील संस्कृतप्रेमींनी एकत्र येऊन संस्कृतच्या अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन केली आहे. त्यांचे वेदांत तत्त्वज्ञानातील ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’, म्हणजे ‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’, असे ब्रीदवाक्य आहे. त्यांच्या वतीने पहिली ‘संस्कृत विश्व कॉन्फरन्स’ वर्ष १९७२ मध्ये नवी देहली येथे आणि १४ वी कॉन्फरन्स १ ते ५ सप्टेंबर २००९ या कालावधीत क्योटो (जपान) येथे भरली होती.
१०. संस्कृतचे ज्ञान आवश्यक का ?
संस्कृत म्हणजे भारताचे हृदय आहे आणि ती विश्वव्यापी होण्याच्या मार्गावर आहे. तिचा अभ्यास प्राथमिक पातळीपासून होऊन सर्व शिक्षण योजनांमध्ये समाविष्ट व्हावा, ही काळाची आवश्यकता आहे. भारताचा प्राचीन गौरव, शास्त्रीय आणि तत्त्वज्ञानविषयक साहित्य समजून घेण्यासाठी संस्कृतचे ज्ञान आवश्यक आहे.
११. संस्कृतचे व्याकरण
संस्कृतची वाक्यरचना मुक्त असल्याने शब्द पुढे-मागे केले, तरी अर्थामध्ये पालट होत नाही. ती सुरचित आणि सर्वार्थाने परिपूर्ण आहे. तिच्यात समास (जोडशब्द) वापरले जातात. तिच्यात अगणित शब्द निर्माण करण्याचे तंत्र आहे. या भाषेत संक्षेपाने वा विस्ताराने दोन्ही पद्धतींनी लिहिता येते. ‘तुलनात्मकरित्या सर्वोच्च पद्धतीने सुरचित असल्याने अद्ययावत् संगणकात भाषांतराची यंत्रे आणि नैसर्गिक भाषाप्रक्रिया क्षेत्रात तिचा उपयोग होऊ शकेल’, असा जाणकारांचा कयास आहे.
१२. संस्कृतमधील विनोद !
विनोद बघा. नदीवर अंघोळ करत असतांना एक राजा मित्रांना ओरडून म्हणाला, ‘मोदकैः (वा मा उदकैः) सिञ्च माम् ।’ म्हणजे ‘माझ्या अंगावर पाणी उडवू नको’; पण संधी केल्यामुळे अर्थ झाला ‘माझ्यावर मोदक फेक !’
१३. संस्कृतमधील शब्दनिर्मिती !
उपसर्गेण धात्वर्थो बलादन्यत्र नीयते ।
प्रहाराहारसंहारविहारपरिहारवत् ।।
अर्थ : उपसर्गामुळे धातूंचा अर्थ बळजोरीने दुसरीकडे नेला जातो. जसे ‘हृ’ (हरण करणे) या धातूवरून प्रहार करणे, आहार (खाणे), संहार करणे, विहार करणे आणि परिहार करणे असे धातूंचे अर्थ पालटतात.
१४. भारताचे काळीज असणारी संस्कृत भाषा जपा आणि तिची मुळे घट्ट करा !
संस्कृत भाषा भारताचे काळीज आहे आणि ती विश्वव्यापी होण्याच्या प्रयत्नात आहे. ती खर्या अर्थाने विश्वभाषा आहे; परंतु भारताचा आद्य गौरव, उच्च परंपरेचे आणि शास्त्र अन् तत्त्वज्ञानविषयक प्रचंड साहित्याचे आकलन करावयाचे असेल, तर ती मनापासून अभ्यासली पाहिजे. तिने अनेक भारतीय आणि जगातील थोरांना स्फूर्ती दिली आहे. संस्कृत भाषेचे शिक्षण प्राथमिक पातळीपासून चालू व्हावयास हवे आणि ‘सर्व शिक्षण अभियान योजने’ला ते जोडले गेले पाहिजे. संस्कृतसाठी आपल्या देशात अनेक पुरेशी विश्वविद्यालये आहेत; परंतु त्यांची मुळे घट्ट केली पाहिजेत.’
– अच्युत राईलकर
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, १.१.२००९)
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !