Online Gaming Bill : राज्यसभेत ‘ऑनलाईन मनी गेमिंग’ विधेयक संमत

हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे यश !

केंद्रीय मंत्री श्री. अश्विनी वैष्णव

नवी देहली – लोकसभेत संमत झाल्यानंतर २१ ऑगस्टला राज्यसभेतही ऑनलाईन गेमिंग विधेयक संमत झाले. यामुळे आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर याचे कायद्यात रूपांतर होणार आहे.

राज्यसभेत विधेयक मांडतांना केंद्रीय मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी या गेमिंगच्या व्यसनामुळे अनेकांनी जीवनभरातील कमाई गमावली आणि त्यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती दिली. देशातील ४५ कोटी लोक या गेमिंगमध्ये गुंतले असून २० सहस्र कोटी रुपये त्यांनी यात गमावल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली.

या कायद्यामुळे आता सरकार या गेमिंगला नियंत्रित करू शकते. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’कडून सातत्याने अशा प्रकारचा कायदा करण्यासाठी सरकारकडे निवेदन देऊन मागणी केली जात होती.