भोसे (जिल्हा सांगली) येथे क्रांतीकारकांच्या चित्र प्रदर्शनाला विद्यार्थी, शिक्षक आणि राष्ट्रप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सांगली, १९ ऑगस्ट (वार्ता.) – क्रांतीकारकांच्या चित्र प्रदर्शनातील माहितीआधारे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करणार आहोत. विद्यार्थ्यांना क्रांतीकारकांच्या जीवनपटाचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली. यातील विजयींना विविध पुरस्कार देण्यात येतील, असे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभाग प्रमुख श्री. भारतबापू यादव यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र माळी आणि श्री. गिरीश पुजारी यांना सांगितले. भोसे (तालुका मिरज) येथे गांधी चौक येथील कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांच्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या प्रदर्शनाचा येथील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, सरपंच, पदाधिकारी आणि राष्ट्रप्रेमी अशा सर्वांनीच लाभ घेतला.
१. ग्रामपंचायतीच्या वतीने ‘सर्व शिक्षा अभियानां’तर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ‘जय हिंद आजी-माजी सैनिक संघटने’च्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
२. या कार्यक्रमात येथील वारकरी संप्रदायाच्या वतीने सर्व वारकरी पालखी घेऊन टाळ-मृदंग आणि विठ्ठलनामाचा गजर करत पालखी घेऊन सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी या वेळी देशभक्तीपर गीतांवर आधारित लेझीम पथक आणि नृत्य सादर केले.
३. येथील सरपंच श्री. पारसनाथ चौगुले, ग्रामपंचायत सदस्या सौ. सीमा जगदाळे, येथील ४ शाळांचे मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षक, ‘ग्रामपंचायत करियर अकॅडमी’चे विद्यार्थी यांना या वेळी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या अभियानांतर्गत निवेदन सादर करण्यात आले.
४. या प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी येथील उद्योजक श्री. ऋषिकेश यादव, श्री. विनायक कोळी आणि सरपंच श्री. पारसनाथ चौगुले यांसह येथील सर्वांचेच मोलाचे सहकार्य लाभले.


अभिप्रायया प्रदर्शनातून होणारी जनजागृती ही काळाची आवश्यकता आहे. आपली संस्कृती जपणे आणि सर्वांनाच त्यासाठी प्रेरित करणे हे आता पुष्कळ आवश्यक आहे. संपूर्ण जगाला सनातन हिंदु धर्मामुळेच मार्गदर्शन मिळत असून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ यावर आधारित सनातन हिंदु धर्मच खर्या अर्थाने सर्वसमावेशक आणि सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे या देशासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी या कार्याची आवश्यकता आहे. – श्री. मनोज पाटील, भाजप |
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !