‘आजीची भाजी रानभाजी’ या मालिकेत आजच्या भाज्या आहेत, गोखरु आणि शतावरी…
(भाग १७)
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/945685.html
१. गोखरु

गोखरु या वनस्पतीला सराटा, काटे गोखरु, लहान गोखरु, गोक्षुर अशी स्थानिक नावे आहेत. उष्ण, कोरड्या अल्प पावसाच्या प्रदेशात ही भूमीवर वाढणारी रोपवर्गीय वनस्पती आहे. गोखरु हे तण असले, तरी ती महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. गोखरू स्नेहन, वेदनास्थापन, मूत्रजनन, संग्राहक आणि बल्य आहेत. शीतल असून मूत्रपिंडास उत्तेजक आहेत. गोखरूची फळे मूत्राच्या विकारांवर, लैंगिक आजारपणात अत्यंत उपयोगी आहेत.
१ अ. भाजी करण्याची पद्धत : भाजीसाठी गोखरूची पाने आणि कोवळी खोडे वापरतात. वारंवार मूतखडा होण्याची प्रवृत्ती थांबते. भाजी स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी. कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग यांची फोडणी करून त्यात भिजवलेली तूरडाळ आणि कांदा परतून घ्यावा. तिखट मीठ घालावे. नंतर थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे.

२. शतावरी

शतावरी ही पुष्कळ पूर्वीपासून स्त्रीच्या शरिरात पुनःउत्पादनासाठी औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते. शतावरी ही शतमुली, शकाकूल या नावानेही ओळखली जाते. शतावरीची अगदी लहान वेल असते.
शतावरीच्या कंदामध्ये स्त्रियांसाठी अनेक औषधी घटक असतात. आयुर्वेदामध्ये शतावरीला ‘स्त्रियांसाठी शक्तीवर्धक’ औषध मानले आहे. मासिक पाळी येण्याअगोदरचा आणि ‘मोनोपॉज’ नंतरचा (मासिक पाळी थांबण्याच्या नंतरचा) त्रास न्यून करण्यास शतावरी साहाय्य करते. स्तनपानात मातांचे दूध वाढवण्यासाठी शतावरी उपयुक्त आहे. शतावरी पाचक अँटीयुक्लिअर, अँटीऑक्सिडंट आणि अँटीकॅन्सर घटक म्हणूनही काम करते. शतावरी यकृताचे संरक्षण करू शकते, हे अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे.
हृदयाचे आणि मूत्रपिंडाचे विकार असणार्या लोकांचा अपवाद वगळता शतावरी सर्वांसाठी सुरक्षित मानली जाते. तरीही वैद्यकीय सल्ल्यानुसारच याचा वापर करावा.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/947208.html
गरम शेक आणि गार शेक
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
‘ओव्हेरियन सिस्ट’ आणि आयुर्वेद
पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी
वर्षा ऋतूचर्या : पावसाळ्यात आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदाचे मार्गदर्शन !