|

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकने येथील भारतीय राजदूतांच्या घराला होणारा पाणी पुरवठा आणि गॅस पुरवठा रोखला. यासह वर्तमानपत्रही बंद केले आहे. पाकने स्थानिक गॅस सिलिंडर पुरवठादारांना भारतीय राजदूतांना सिलिंडर न विकण्याचा आदेश दिला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा सूड उगवण्यासाठी पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणेने) आखलेल्या कटातील हा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर पाकने राजदूतांना असाच त्रास दिला होता. पाकच्या आताच्या कृतीनंतर भारताने देहलीतील पाकिस्तानी राजदूतांना वर्तमानपत्रे पोचवणे बंद केले आहे.
🚨 Pakistan’s Petty Revenge for ‘Operation Sindoor’!
Water, gas & newspapers cut off at Indian Diplomat’s residence in Islamabad – a clear breach of the 1961 Vienna Convention (Art. 25).
Such childish antics only expose Pakistan’s desperation before the world.
India should… pic.twitter.com/QEgvVnHvaX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 12, 2025
आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन !
पाकने केलेली कृती राजनैतिक संबंधांवरील ‘व्हिएन्ना करारा’चे (वर्ष १९६१) उल्लंघन आहे. कराराच्या कलम २५ नुसार यजमान देशाने राजनैतिक मोहिमेचे सुरळीत कामकाज चालवण्यासाठी सर्व सुविधा पुरवल्या पाहिजेत. जाणूनबुजून आवश्यक वस्तू रोखून पाकिस्तानने दूतावासाचे काम आणि राजदूतांचे दैनंदिन जीवन विस्कळीत केले आहे.
संपादकीय भूमिका
|
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव