पावसाळ्यात विविध गुणधर्म असणार्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक या खाण्यायोग्य असतात. विशेषत: आदिवासींनी या शोधून काढल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही आहेत. या रानभाज्यांना ओळख मिळवून त्यांची लागवड, उत्पादन, विक्री अशी साखळी निर्माण करून शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास साहाय्य मिळणार आहे.
रानभाज्या या खर्या तर आरोग्याचा खजिना असतात. अशा रानभाज्यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयाकडून चालू केलेल्या या मालिकेत आजची भाजी आहे शेवळी !
(भाग १४)
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/944052.html
शेवळी
१. शेवळी
शेवळी ही भाजी आपल्याला साधारण पावसाळ्याच्या प्रारंभी बघायला मिळते. ही भाजी जंगलात मिळते.
१ अ. भाजी करण्याची पद्धत
कुठलीही भाजी करण्याआधी ती स्वच्छ धुऊन घ्यावी. भाजीचे टोक कापून टाकावे. देठानंतरच्या शेवटच्या भागावर एक पेर पिवळसर दाण्यासारखा असणारा भाग काढून टाकावा. भाजीवर मक्याच्या कणसासारखे दोन-तीन वेष्टने असतात. राहिलेला निमुळता भाग गोलाकार चिरून घ्यावा. तव्यावर भरपूर तेल घालून भाजून घ्यावी.

भाजून झाल्यावर ती भाजी एका छोट्या कुकरमध्ये टाकून, पाणी घालून ७-८ शिट्या काढाव्यात कुकर थंड झाल्यावर पाणी काढून भाजी परतायला घ्यावी.
कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, बारीक चिरलेला कांदा घालून परतावे. कांदा लाल झाला की, त्यात हळद घालून, उकडलेली भाजी घालून परतावी. कांदा, खोबरे, गरम मसाल्याचे वाटण आणि लाल तिखट अन् थोडे पाणी घालून भाजी शिजवावी. थोड्या वेळाने मीठ, चिंचेचा कोळ आणि काकडांचा काढलेला रस घालून भाजी अजून थोडा वेळ शिजू द्यावी. भाजी थोडी पातळ असावी.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/945359.html

अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !