भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचे विधान

भोपाळ (मध्यप्रदेश) – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर त्यांच्या मूळगावी, म्हणजे भोपाळमध्ये परतल्या. त्या वेळी ‘भारतमाता की जय’च्या घोषणांसह पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. येथे पत्रकारांशी बोलतांना साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, कोण म्हणतो आतंकवादाचा रंग नसतो ? आतंकवादाचा रंग हिरवा आहे. हिरव्या रंगाच्या झेंड्याखाली आतंकवाद पसरवला जातो. या लोकांनी हिरवा रंग घेऊन पहलगाममध्ये जे काही केले, ते सर्वांच्या समोर आहे. तेथे आतंकवाद्यांनी लोकांना विचारले, ‘तू हिंदु आहेस का ?’ आणि मग कपडे उतरवून तपासून गोळ्या झाडल्या. ‘मुसलमान आतंकवाद’ असतो, हे निश्चित आहे.
हिंदू कधीच आतंकवादी असू शकत नाहीत !
साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या की, मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात १७ वर्षे शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला; मात्र शेवटी सत्याचाच विजय झाला. काँग्रेसने ‘भगवा आतंकवाद’ ही खोटी कथा सिद्ध केली; मात्र ती टिकली नाही. हिंदू कधीच आतंकवादी असू शकत नाहीत; कारण हिंदू सहिष्णु असतात. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हीच आमची शिकवण आहे. काँग्रेसने अधर्मी मानसिकतेला खतपाणी घातले आणि हिंदूंना अपमानित करण्याचा कट रचला. काँग्रेस आतंकवाद्यांसाठी अश्रू ढाळते आणि हिंदूंना त्रास देते. दिग्विजय सिंह तर पूर्णपणे दिग्भ्रमित झाले आहेत. त्यांचे नावच अशुभ आहे.
(म्हणे) ‘आतंकवादाला कोणताही धर्म नसतो ! – ऑल इंडिया इमाम असोसिएशनसाध्वी प्रज्ञा यांच्या या विधानावर विरोधी पक्ष आणि मुसलमान संघटना यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्या आली. ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशीदी यांनी साध्वींचे विधान म्हणजे ‘इस्लामोफोबिया’ (इस्लामद्वेष) असल्याचे म्हटले. रशीदी म्हणाले की, आतंकवादाला कोणत्याही धर्माशी जोडणे हे केवळ चुकीचेच नाही, तर समाजाला विभागणारे आहे. जेव्हा इतर धर्मांचे लोक पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.साठी (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) हेरगिरी करतांना पकडले जातात, तेव्हा त्यांना ‘हिंदु आतंकवादी’ किंवा ‘भगवा आतंकवादी’ म्हणतात का ? (अशा देशद्रोह्यांना फाशीच दिली पाहिजे, अशीच हिंदूंची मागणी असते; मात्र जेव्हा जिहादी सापडतात, तेव्हा किती संघटना किंवा मौलाना रशिदी आणि त्यांची संघटनातरी अशांना फाशी देण्याची मागणी करतात ? – संपादक) आतंकवाद्यांना कोणताही धर्म नसतो, ते मानवतेचे शत्रू असतात. (इस्लामिक स्टेट, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, सिमी आदी जिहादी संघटनांविषयी रशिदी कधी असे बोलले आहेत का ? – संपादक) संपादकीय भूमिकाजेव्हा काँग्रेसने ‘हिंदु आतंकवाद’ आणि ‘भगवा आतंकवाद’, असे शब्द म्हणणे चालू केले, तेव्हा मुसलमान संघटनांनी त्याला विरोध करत ‘आतंकवादाला कोणताही धर्म नसतो’, असे का म्हटले नाही ? देशात गेल्या ३५ वर्षांपासून जिहादी आतंकवाद चालू असतांना त्याविरोधात एकातरी मुसलमान संघटनेने रस्त्यावर उतरून कधी निषेध केला आहे का ? एका तरी जिहादी आतंकवादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली का ? उलट त्या संघटनांवरील बंदीला विरोधच केला आहे ! |
साध्वी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत ! – काँग्रेस
काँग्रेसचे मध्यप्रदेश प्रवक्ते भूपेंद्र गुप्ता यांनी साध्वींच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, न्यायालयांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, आतंकवादाला कोणताही रंग नसतो. साध्वी प्रज्ञासिंह यांचे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. त्या पुन्हा एकदा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
संपादकीय भूमिका
काँग्रेसने ‘हिंदु आतंकवाद’ असे म्हटले, तर ती वस्तूस्थिती आणि साध्वी प्रज्ञासिंह यांनी ‘मुसलमान आतंकवाद’ म्हटले, तर तो फूट पाडण्याचा प्रयत्न, हा काँग्रेसचा दुटप्पीपणाच नव्हे, तर हिंदुद्वेष अन् मुसलमानप्रेम आहे !
संपादकीय : बंगालमधील कालचक्र !
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक