
कांचीपूरम् (तमिळनाडू) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी प्रतिदिनप्रमाणे २९ जुलै या दिवशी (‘नागपंचमी’च्या दिवशी) अग्निहोत्र केले. या अग्निहोत्राच्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘नागपंचमी’च्या निमित्ताने नवनागांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभावे, आगामी आत्पकाळात साधकांचे रक्षण व्हावे आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, अशी प्रार्थना केली, तसेच त्यांनी ‘ॐ नवकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नो सर्पः प्रचोदयात् ।’,
(अर्थ : आम्ही नवकुळांच्या नागाचे स्मरण करतो, विषदंताचे ध्यान करतो. तो नाग आम्हाला प्रेरित करो.) हा ‘नाग गायत्रीमंत्र’ १०८ वेळा म्हणत अग्निहोत्र पात्रात आहुती दिली. यानंतर अग्नीच्या निखार्यावर नागाची आकृती उमटलेली दिसली, तसेच धुरातही अनेक नाग अग्नीकडे झेपावत असल्याचे दिसत होते. ‘नवनागांना प्रार्थना केल्याने अनेक नाग दिसल्याची आणि त्यांच्यापर्यंत प्रार्थना पोचल्याची प्रचीती नागदेवतेने दिली’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना जाणवले.
|
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !