१७ मे २०२५ या दिवशी फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘सनातन राष्ट्र संकल्प धर्मसभा’ या विषयावर ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके आणि सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

१. सनातन संस्थेचे शताब्दी वर्ष साजरे व्हावे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना जन्मोत्सवाच्या निमित्ताने नमस्कार करण्यासह आणि पुढील वर्षी ८४ वा जन्मोत्सव याच गोवा येथील मैदानावर होईल, अशी इच्छा व्यक्त करतो. २५ वर्षे सामान्य संस्थेच्या दृष्टीने विशेष असत नाहीत; परंतु सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली, तरी ही वर्षे २५० वर्षांहून अधिक महत्त्वपूर्ण आहेत; कारण सनातन संस्थेला संघर्ष करावा लागला आहे. हा संघर्षाचा विजय आहे. त्यामुळे २५ वर्षे विशेष आहेत. या संस्थेचे शताब्दी वर्ष साजरे व्हावे, अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
२. ‘सुदर्शन वाहिनी’ चालू करण्यासाठी कृपाशीर्वाद देणार्यांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रथम नाव येते !

वर्ष २००८ मध्ये हिंदु आतंकवादाची चर्चा चालू होती. त्या वेळी ‘हिंदु आतंकवादी आहेत’, असे षड्यंत्र रचले जात होते. साध्वी प्रज्ञा सिंह यांना अटक करण्यात आली होती, मालेगाव स्फोट प्रकरणात अनेक लोकांना अटक झाली होती. माझ्यावर आरोप करण्यात आला की, मालेगाव स्फोट प्रकरणाची माहिती घटनेच्या ३ मिनिटांपूर्वी माझ्या वृत्तवाहिनीवरून दाखवण्यात आली. पुढे सनातन संस्थेची अपर्कीती करून साधकांना अटक केली जात होती. सनातनची अपर्कीती करण्याचे मोठे अभियान चालू होते. अशा प्रकारे हिंदु धर्माची अपर्कीती चालू असतांना मी काही वर्षांपूर्वी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यांनी जी माहिती दिली, त्याची प्रचीती वास्तवात आज वर्ष २०२५ मध्येही येत आहे. प.पू. डॉक्टरांची जी दिव्यदृष्टी आहे, त्याचाच हा परिणाम असल्याने येथे मोठी संख्या आहे. मी हिंदुत्वनिष्ठ सुदर्शन वृत्तवाहिनी चालू केली असल्याचे त्यांना सांगितले. त्या वेळी ही वाहिनी चालवायची कशी ? याची त्यांनी पूर्ण माहिती काढली होती. आतापर्यंत ही वाहिनी चालवण्यासाठी ज्यांनी कृपाशीर्वाद दिले, त्यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे नाव प्रथम आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांनीही वृत्तवाहिनी चालू केली असती. दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनी यांनी सतत अन्यायाच्या विरोधात लढा दिला आहे. त्याचे मालक संत, साधक आणि इतरही आहेत.
३. राजकीय नेत्यांऐवजी सनातन संस्थेचे गुणगान गाणे कधीही चांगले !
सनातन संस्थेची वेगळी गोष्ट आहे. चांगल्या गोष्टींचे गुणगान गायाला हवे, त्यानुसार सनातन संस्थेचे गुणगान अवश्य गायिले पाहिजे. माझ्या तोंडून राजकीय नेत्यांविषयी कधीही गुणगान गायिले जात नाही. इतर आध्यात्मिक संघटना विज्ञानाच्या आधारे हिंदूंना मार्गदर्शन करतात. ब्राह्मतेजाविषयी माहिती देतात; मात्र सनातन संस्था ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे ज्ञान देऊन धर्मकार्य करत आहे.
४. धर्म, अध्यात्म आणि विज्ञान लोकांसमोर सादर करत असल्याने सनातन संस्था सर्वश्रेष्ठ संस्था आहे !

सनातन संस्था सर्वश्रेष्ठ काम करत आहे. माझ्या मताशी संतही सहमत आहेत. सनातन संस्था ही आतंकवादी संघटना असल्याचा गंभीर आरोप होत असतांना, तसेच सनातनच्या अनेक साधकांना अटक केली जात असतांना संस्थेने न डगमगता सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या ठिकाणी संस्थेने शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवले आहे. यावरून सनातन संस्थेने हिंदु धर्मावरील निष्ठा आणि विचार यांची प्रतिबद्धता दाखवली आहे. सनातनवर अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप केला जातो. मी एकदा देहली येथील पत्रकारासमवेत रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहायला गेलो होतो, त्या वेळी साधकांनी मला आश्रमातील फरशी दाखवली, भिंती, विविध चिन्ह सिद्ध केले होते, ते दाखवण्यात आले. अनिष्ट शक्ती कशा त्रास देतात ? त्या शक्तींची इतर माहिती मला सनातनच्या आश्रमातून मिळाली. नकारात्मक शक्ती कशा काम करतात ?, हे साधक दाखवत होते. हे पाहून माझ्यासमवेत आलेल्या देहलीच्या पत्रकाराने मला म्हटले, ‘‘सुदर्शनजी, मला इकडे कुठे घेऊन आला आहात. या काही शक्ती आहेत का ?’’ मी त्याला म्हणालो, ‘‘जी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, ती गोष्ट नाही, असे साम्यवादी सांगतात. हिंदु दर्शन हे सांगतो की, जी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, ती गोष्ट मानून जाणून घेण्याची प्रक्रिया संतांकडून केली पाहिजे.’’ ती प्रक्रिया आम्ही केली. आज मी गर्वाने सांगतो की, हिंदुस्थानात अनेक संघटना, साधू आणि संत आहेत. ते वैज्ञानिक दृष्टीकोनातून समाजाला माहिती देतात; मात्र सनातन संस्था एकमेव संस्था आहे की, धर्म, अध्यात्म, विज्ञान हे लोकांसमोर सादर करते. ही संस्था सर्वश्रेष्ठ काम करत आहे. याविषयी संस्थेला याचे प्रमाणपत्र दिले, तरी माझी काही हरकत नाही. सर्व संत माझ्या मताशी सहमत असतील.
५. भगवान श्रीकृष्णाच्या ‘पांचजन्य’ शंखाचा नाद सर्वश्रेष्ठ ‘शंखनाद’ आहे !
मंदिरात गेल्यावर देवतेच्या मूर्तीचे दर्शन कसे घ्यावे, कशा पद्धतीने आणि कोणत्या दृष्टीने दर्शन घ्यावे, जेणेकरून त्याचा आपल्याला लाभ होईल. ‘अँटेना’ची छत्री योग्य दिशेने न लावल्यास टीव्हीवरील कार्यक्रम स्पष्ट दिसणार नाहीत, तसेच योग्य दिशेने छत्री लावल्यास वाहिन्यांवरील कार्यक्रमाचा दर्जा उत्तम पहाता येईल. हेच आपल्या संतांच्या दिव्यशक्तीचे उदाहरण असते. येथे जो कार्यक्रम होत आहे, त्याचे नाव ‘शंखनाद’ आहे. भगवान श्रीकृष्णाच्या ‘पांचजन्य’ शंखाचा सर्वश्रेष्ठ ‘शंखनाद’ आहे. ‘पांचजन्य’ आणि ‘सुदर्शन चक्र’ यांचे नाते आहे. ‘पांचजन्य’ चालू झाल्यावर ‘सुदर्शन’ चालते. ‘सुदर्शन’ चालू झाल्यावर अधर्माचा नाश होतो. स्वतःतील अधर्म वृत्तीचा नाश करण्यासाठी येथे मोठ्या संख्येने लोक आले आहेत.
६. गोवा ही ‘भोगभूमी’ नसून ‘योगभूमी’ असल्याचे सनातन संस्थेने दाखवून दिले !
सनातन संस्थेचे मुख्यालय गोवा हे आहे. गोव्यातच हा महोत्सवाचा कार्यक्रम का ठेवला ? काही जणांना भीती वाटते. अन्य शहरात हा कार्यक्रम ठेवायला हवा होता, असे काही जणांना वाटते; मात्र गोवा ही ‘भोगभूमी’ नसून ती ‘योगभूमी’ आहे, हे सनातन संस्थेने दाखवून दिले आहे. हेच आपल्याला स्थापित करायचे आहे. गेल्या २५ वर्षांत हे स्थापित झाले आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज गोवा येथे आल्यानंतर भगवा झेंडा फडकला होता, तसे आज महोत्सवाच्या निमित्ताने गोवा येथील चौकाचौकांत भगवा ध्वज फडकत असल्याचे पाहून माझ्यासह सर्व हिंदूंना आनंद होत आहे. संस्थेने २५ ते ३० वर्षे विविध माध्यमातून हिंदु धर्माचा प्रसार केल्यानंतर आता गुरुदेवांनी विराट रूपात सर्वांना दर्शन देणे आवश्यक होते, यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातून विश्वरूपाचे दर्शन मला होत आहे.
७. महोत्सवामुळे लोकांची नकारार्थी भूमिका सकारात्मक झाली !
‘या महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांतून नकारार्थीपणा न्यून होऊन स्फूर्ती मिळत आहे’, असा संदेश शिकागो येथून श्री. नरसिंह राजपूत नावाच्या ९३ वर्षाच्या एका दर्शकाने माझ्या भ्रमणभाषवर पाठवला आहे. ते गृहस्थ म्हणाले, ‘आपल्या वाहिनीच्या माध्यमातून गोवा येथे चालू असलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातून शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन पाहिले, त्या वेळी शरिरात विजेप्रमाणे ऊर्जा होती. मी अधिक वेळेने ‘व्हिल चेअर’वरून (चाकाच्या आसंदीवरून) उभे राहिलो. मी अहिंसक आणि भित्र्या हिंदूंना पाहून निराश झालो होतो; पण हे पाहून मी आनंदित झालो आहे. हिंदु लढू शकतो, विजयी होऊ शकतो, अशी सनातन संस्था आणि असे लोक जिवंत आहेत, हे पाहून आज मी आनंदाने मरायला सिद्ध आहे.’ ते नैराश्यातून जग सोडून जाणार होते, त्यांना आशा दिसत नव्हती. याहून आणखी काय हवे ! ९३ वर्षांच्या त्या व्यक्तीत वीज चमकू शकते, तर महोत्सवात उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या संस्थांचे २५ सहस्र साधक आणि धर्मप्रेमी हे संपूर्ण हिंदुस्थानात वीज का चमकवू शकणार नाहीत ?
८. गोवासारख्या ठिकाणी सनातन संस्थेने वटवृक्ष उभा केला !
‘सनातन संस्थेचे साधक आणि धर्मप्रेमी अवश्य हिंदुस्थानाला जागे करतील, हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतात, धर्मांतर रोखू शकतील, लव्ह जिहाद थांबवू शकतील’, याचा मला पूर्ण विश्वास आहे. गोवा येथे ३४१ वर्षे, ४ महिने, १७ दिवसांपूर्वी ३१ डिसेंबर १६८३ मध्ये छत्रपती संभाजी महाराज येथे सैन्य घेऊन आले होते. त्या वेळी त्यांनी पोर्तुगिजांचा पराभव केला होता. आज मी डोळ्याने पहातो की, गोवा येथील चौकाचौकांत भगवा ध्वज फडकत आहे. इतिहासकारांच्या पुस्तकात हे मी वाचले होते. ‘धर्माच्या कार्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला आशीर्वाद द्यावा’, अशीच माझी मागणी आहे. ‘या कार्यक्रमाची इतकी भव्यता का आहे ?’, हे लिखाण मी सामाजिक माध्यमांवर वाचले. मी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांना विचारले, तर त्यांनी सांगितले, ‘सनातन सूक्ष्मातील जशी चर्चा करते, तसेच पैसे व्यय करून हा कार्यक्रम घेत आहे.’ मी प.पू. डॉ. आठवले यांना सांगितले की, विराट रूपाचे दर्शन देणे आवश्यक असते. आज त्या विराट रूपाचे दर्शन दिले जात आहे. व्यासपिठावरील एवढ्या मोठ्या व्यक्तींना भेटण्यासाठी पंतप्रधानांनाही वेळ मागून घ्यावी लागते. सनातनसारख्या संस्थेने गोव्यासारख्या ठिकाणी सनातनची शाखा चालू करून तिचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांची शाखा विदेशात जात आहे. आज २५ देशांतून लोक येथे आले आहेत. हे सर्व आपल्या पराक्रमाने यशस्वी झाले आहे.
९. लढणारे हिंदुत्वनिष्ठ आणि गोरक्षक यांना हिंदूंनी साहाय्य करावे !
श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले, ‘‘कोणताही गोरक्षक अडचणीत असेल, हिंदू लढत असेल, तर आजच्या महोत्सवातून अनेक लोक काहीतरी करण्याची इच्छा बाळगून असतील, तर त्यांनी असे कार्य करणार्या हिंदूंना साथ द्यावी. येथे संत आहेत, मी एकटा येथे सैनिकाच्या रूपात उभा आहे. त्यांना प्रणाम करून या धर्माच्या लढाईत मी संतांचा आशीर्वाद मागत आहे.’’
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !