
मुंबई – वर्ष २००६ मधील मुंबई साखळी बाँबस्फोटातील १२ आरोपींची निर्दाेष सुटका केल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या बहुचर्चित निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्यशासनाने सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर २४ जुलै या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वाेच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला.
हा निर्णय देतांना निर्दाेष म्हणून कारागृहातून मुक्त केलेल्या आरोपींना पुन्हा कारागृहात जाण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. न्यायमूर्ती एम्.एम्. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन्.के. सिंह यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. महाधिवक्ता तुषार मेहता यांनी महाराष्ट्र शासनाची बाजू मांडतांना ‘जरी दोषींना निर्दोष ठरवून त्यांना कारागृहाच्या बाहेर सोडले असले, तरी त्यांना पुन्हा कारागृहात आणण्याचा प्रश्न नाही; पण या निर्णयाचा परिणाम अन्य ‘मकोका’ खटल्यांवर होऊ शकतो. हा निर्णय अन्य खटल्यांमध्ये वापरला जाईल आणि त्याचा फटका पोलीस, अन्वेषण आणि अन्य यंत्रणा यांना बसू शकतो’, असे नमूद केले.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !