गंभीररित्या घायाळ झाल्याने रुग्णालयात उपचार चालू

ॲडलेड (ऑस्ट्रेलिया) – येथील किंटोर ॲव्हेन्यू परिसरात चरणप्रीत सिंह या भारतीय तरुणावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. यात चरणप्रीत रस्त्यावरच बेशुद्ध होऊन पडला. आक्रमण करतांना आक्रमण करणारे ‘येथून निघून जा, इंडियन’ असे म्हणत शिव्या देत होते. हे आक्रमण वर्णद्वेषातून करण्यात आले.
Indian Youth Attacked in Racist Assault in Adelaide Australia!
🩸Charanpreet Singh critically injured, currently hospitalised
🗣️ “This incident is completely unacceptable!” – South Australia Premier Peter Malinauskas
🤫 Foreigners who bash India’s law & order are silent on… pic.twitter.com/V24OaHUgot
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 23, 2025
काय घडले ?
२३ वर्षीय चरणप्रीत सिंह त्याच्या चारचाकी गाडीमध्ये होता, तेव्हा काही लोकांनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर या लोकांनी त्याच्यावर अचानक वर्णद्वेषी शब्द वापरत शिवीगाळ करत मारहाण चालू केली. यात चरणप्रीतच्या डोक्यावर खोल जखम झाली, तर चेहर्याच्या हाडांचे अस्थिभंग झाले. त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. या घटनेनंतर येथील भारतीय समुदायांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. हिंसाचार करणार्यांवर कठोर शिक्षा करण्याची मागणी सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आली आहे.
हा प्रकार पूर्णपणे अस्वीकार्य ! – साऊथ ऑस्ट्रेलियाचे मुख्यमंत्री पीटर मलीनाउसकस

साऊथ ऑस्ट्रेलियाचे मुख्यमंत्री पीटर मलीनाउसकस यांनी या आक्रमणाचा तीव्र निषेध केला. त्यांनी ‘हा प्रकार पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि आमच्या समाजाच्या मूल्यांशी विसंगत आहे’ असे स्पष्ट सांगितले.
परत भारतात जावे, असे वाटते ! – चरणप्रीत सिंह

या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना चरणप्रीत सिंह म्हणाला, ‘‘या घटनेने मला आतून हादरून सोडले आहे. अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा वाटते की, परत भारतात जावे. शरिराचे काही भाग पालटू शकतो; पण त्वचेचा रंग नाही.’’
संपादकीय भूमिकाभारतातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून टीका करणारे विदेशी त्यांच्यातील वर्णद्वेषाविषयी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी