|

इस्लामाबाद (पाकिस्तान) – एका ज्योतिषाच्या भविष्यवाणीमुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. या ज्योतिषाने पाकिस्तानसाठी अत्यंत विनाशकारी ठरू शकणारे ४ दिनांक सांगितले असून ‘त्या दिवसांत पाकवर पुन्हा आक्रमण होणार आहे’, असे त्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे या भविष्यवाणीवर विश्वास ठेवून पाकिस्तानने त्याचे हवाई क्षेत्र बंद केले आहे.
🔮 Astrologer’s Prediction Shakes Pakistan!
🇵🇰 Pakistani astrologer Osama Ali Khan warns of major attacks on 4 specific dates – says “Destruction is coming!”
✈️ In panic, Pakistan shuts down its airspace!
Fear spreads despite no signs of threat from India…
🇮🇱 Speculation… pic.twitter.com/Mjw2cbPst8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 22, 2025
पाकिस्तानातील प्रसिद्ध ज्योतिषी ओसामा अली खान याने दावा केला आहे की, या वेळचे आक्रमण पुष्कळ मोठे असणार आहे. ज्यांनी आधी आक्रमण केले, ते पुन्हा का करणार नाहीत ? या वेळी त्यांना असा मोठा प्रसंग हवा आहे, ज्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे डागता येतील.
भारताकडून नव्हे, तर इस्रायलकडून आक्रमणाची शक्यता !
ओसामा अली खान याने ‘ऑपरेशन सिंदूर’विषयीही भविष्यवाणी वर्तवली होती. यानेच पूर्व पाकिस्तानमध्ये प्रलयंकारी पूर येणार असल्याचेही भाकित त्याने वर्तवले होते. ही दोन्ही भाकिते खरी ठरली होती. ओसामा अली खान याच्या सलग दोन भविष्यवाण्या खर्या ठरल्याने पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आक्रमणाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने १६ ते २३ जुलै या कालावधीत त्याचे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. काहींचा दावा आहे की, हे आक्रमण भारताकडून नव्हे, तर इस्रायलकडून होणार आहे.
पाकिस्तानला भारतापेक्षा इस्रायलकडून अधिक धोका !
पाकिस्तानी पत्रकार फिजा अकबर खान यांनी यावर म्हटले आहे की, पाकिस्तानकडे अण्वस्त्र आणि मोठे सैन्य आहे, त्यामुळे त्याच्या अस्तित्वामुळे इस्रायलला चिड येते. गाझा, सीरिया, लेबनॉन आणि इराण यांवर इस्रायलचे आक्रमण केवळ दिखावा आहे. इस्रायलचे खरे लक्ष्य पाकिस्तानच आहे; कारण हा देश (पाकिस्तान) ‘ग्रेटर इस्रायल’च्या (बृहत इस्रायलच्या) स्वप्नाचा अंत करू शकतो.
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव