
सुवा (फिजी) – प्रशांत महासागरातील ऑस्ट्रेलिया देशाच्या जवळ असणारा बेटांचा देश फिजीमधील ऐतिहासिक सांबुला शिव मंदिरावर आक्रमण करून मंदिर आणि आतील मूर्ती यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यामुळे तेथील हिंदू संतप्त झाले आहेत. ‘फिजीमध्ये रहाणार्या भारतीय वंशाच्या नागरिकांवरील आक्रमणे वाढली असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे’, असे वक्तव्य फिजीचे माजी अटॉर्नी जनरल अय्याज सय्यद खायुम यांनी केले आहे. या प्रकरणी एका २८ वर्षाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला सुवा न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २ आठवड्यांची कोठडी सुनावली आहे. फिजीच्या पोलीस आयुक्तांनी या घृणास्पद कृत्याबद्दल संताप व्यक्त केला. नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. फिजीमध्ये २४ टक्के हिंदु लोकसंख्या आहे.
हिंदु समुदायाच्या आध्यात्मिक भावनांना मोठा धक्का
फिजीमधील श्री सनातन धर्म प्रतिनिधी सभेने सरकारकडे प्रार्थनास्थळांची सुरक्षा वाढवण्याची आणि कायदा अधिक कठोर करण्याची मागणी केली आहे. ‘फिजीमध्ये या शिवमंदिराभोवती कुंपण होते. आरोपी ते कुंपण चढून मंदिरात घुसला. मंदिरातील गर्भगृहातील मूर्तींची त्याने तोडफोड केली. तिथे देखभालीसाठी असलेल्या व्यक्तीवरही त्याने आक्रमण केले, अशी माहिती श्री सनातन धर्म प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष धीरेंद्र नंद यांनी दिली. या घटनेमुळे हिंदु समुदायाच्या आध्यात्मिक भावनांना मोठा धक्का बसला आहे. ते दु:खी आहेत, असे नंद म्हणाले.
आर्य प्रतिनिधी सभेनेही फिजीमधील या घटनेचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. ‘आर्य सभा अशा घटनांकडे गुन्हेगारी कृती आणि धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत सिद्धांत यांवरील आक्रमण म्हणून पहाते. परस्परांविषयी आदर आणि शांततेने दुसर्याला जगू देणे, हा फिजीच्या बहुसांस्कृतिक समाज व्यवस्थेचा पाया आहे’, असे आर्य सभेने म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे भारतातच असुरक्षित असतील, तर विदेशात त्यांच्यावर आक्रमण झाली, तर आश्चर्य ते काय ? |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी