केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र

नवी देहली : बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिले. निकृष्ट दर्जाची खते वापरल्याने शेतकर्यांची होणारी हानी टाळण्यासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण खते वेळेवर आणि योग्य दरात उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
🚨 Strict action must be taken against substandard fertilizers! – Union Agri Minister Shivraj Singh Chouhan
📩 Letter to all CMs: Act against fake fertilizers & curb black marketing 🛑
👨🌾 Ensure farmers get quality, affordable fertilizers on time! 🌾✅
PC: @AmarUjalaNews pic.twitter.com/AXw3F3LcuL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 15, 2025
केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे की,
१. कृषी ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकर्यांचे उत्पन्न स्थिर ठेवण्यासाठी दर्जेदार खतांची वेळेवर उपलब्धता होणे अत्यावश्यक आहे. बनावट खतांची विक्री, अनुदानावरील खतांचा काळाबाजार यांसारख्या बेकायदा प्रकारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
२. खतांची उपलब्धता सुनिश्चित करणे, हे राज्यांचे दायित्व आहे. काळाबाजार, वाढीव किमतीत विक्री आणि अनुदानावरील खतांचे चुकीच्या पद्धतीने वितरण, यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. यासह खतांचे उत्पादन आणि विक्री यांवर नियमित देखरेख ठेवून चाचणी प्रक्रियेद्वारे निकृष्ट दर्जाच्या खतांवर नियंत्रण ठेवणेही आवश्यक आहे.
आज नई दिल्ली स्थित कृषि भवन में बायोस्टिमुलेंट की बिक्री के संबंध में वरिष्ठ अधिकारियों के साथ महत्वपूर्ण बैठक की और आवश्यक दिशा-निर्देश दिए।
अब बायोस्टिमुलेंट उत्पादों की अनुमति सिर्फ तभी दी जाएगी, जब वे वैज्ञानिक परीक्षण में खरे उतरें और किसान के हित में हों। हर कदम पर हमें… pic.twitter.com/ya5naG074P
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 15, 2025
३. शेतकर्यांना या प्रकारांपासून वाचवण्यासाठी त्यांना जागरूक करणे आणि त्यांच्याकडून अभिप्राय घेण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !