
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये लाल चंद उपाख्य सोहाग या हिंदु भंगार व्यापार्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. ९ जुलैला मिटफोर्ड रुग्णालयाजवळ ही घटना घडली. आरोपींनी लाल चंद यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहावर उभे राहून नाच केला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या घटनेवरून शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि अंतरिम सरकारवर जमावाकडून होणारा हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याचा आरोप केला.

१. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, मग त्याची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी असो. एकाही गुन्हेगाराला आश्रय दिला जाणार नाही. (बोलाची कढी आणि बोलाचा भात ! – संपादक) हत्येचा खटला जलद गती न्यायाधिकरणाकडे हलवण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
२. या हत्येचे कारण खंडणी आणि व्यावसायिक वाद असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी अधिवक्ता युनूस अली अकंद यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करून हत्येच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.

३. या प्रकरणात १९ आरोपींची नावे आहेत आणि १५ ते २० अज्ञात आरोपींचाही यात सहभाग आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशात पुढील काही वर्षांनी अशा घटना कधीही घडणार नाहीत; कारण बांगलादेशात एकही हिंदु शिल्लक रहाणार नाही ! त्यानंतर भारतातही अशीच स्थिती येणार आणि साधारण १०० वर्षांनी अशा घटना भारतात नित्याच्या होतील, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे ! |
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !