या आतंकवाद्याच्या अटकेमुळे मोठे खुलासे होण्याची शक्यता

पुणे – ‘इंप्रूव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (‘आयईडी’)’ म्हणजे बाँब बनवण्याचे आणि गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण देणार्या इसिसच्या रिझवान अली उपाख्य अबू सलमा उपाख्य मौला या आतंकवाद्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) बेड्या ठोकल्या आहेत. ‘इसिस मॉड्यूल’ प्रकरणातील तो एक मुख्य आरोपी असल्याने त्याच्याविरुद्ध विशेष एन्.आय.ए. न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. हा या गुन्ह्यातील अटक केलेला ११ वा आरोपी आहे. त्याच्यावर ३ लाख रुपयांचे पारितोषिकही घोषित करण्यात आले होते. या आतंकवाद्याच्या अटकेमुळे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. ‘एन्.आय.ए.’च्या अन्वेषणात उघड झाल्याप्रमाणे रिझवान अली हा इसिसच्या भारतातील कारवायांमध्ये सक्रीयपणे सहभागी होता.
या प्रकरणात आतापर्यंत महंमद इम्रान खान, महंमद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सीमाब नासिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदवाला, शामिल नाचन, अकीफ नाचन, शहनवाज आलम, अब्दुल्ला फैयाज शेख, तल्हा खान यांना अटक करण्यात आली आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !