
ईटानगर (अरुणाचल प्रदेश)/भुवनेश्वर (ओडिशा) – अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा येथे २ वेगवेगळ्या घटनांमध्ये मुली आणि महिला यांच्यावर बलात्कार करून त्यांचे लैंगिक शोषण करणार्या वासनांधांची जमावाने हत्या केली.
अरुणाचल प्रदेशमध्ये पोलीस ठाण्यात घुसून बलात्कार्याची हत्या
१. अरुणाचल प्रदेशमधील लोअर दिबांग व्हॅलीमध्ये एका बलात्कारी तरुणाला मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना रोइंग शहरातील पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांच्या उपस्थितीत घडली.
२. या तरुणावर २० हून अधिक मुलींवर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. तो मुलींच्या वसतीगृहात जाऊन त्यांच्याशी गैरवर्तन करायचा. काही पीडित मुलींनी पोटदुखीची तक्रार केली, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.
३. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर शेकडो लोकांचा जमाव पोलीस ठाण्यात घुसला आणि त्या तरुणाला बाहेर खेचून मारहाण केली. पोलिसांनी सांगितले की, तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Mob Justice or Desperation? 😡
In Arunachal Pradesh, a teen rape accused was lynched by a mob.
In Odisha, women who were his victims killed a 60-year-old rapist & burned his body. 🔥
With rapists not facing swift and severe punishment, mobs are increasingly taking the law into… pic.twitter.com/4WRqWxKP64
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 13, 2025
ओडिशामध्ये पीडित महिलांनी बलात्कार्याची हत्या करून त्याचा मृतदेह जंगलात जाळला
ओडिशा राज्यातील गजपती जिल्ह्यात ६० वर्षीय बलात्कार्याची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी ८ महिला आणि २ पुरुष, अशा १० जणांना अटक केली. गावापासून अनुमाने २ किमी अंतरावर असलेल्या जंगलाजवळील एका टेकडीवरून पोलिसांनी मृताची हाडे आणि राख जप्त केली. पकडलेल्या सर्व महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विधवेवर बलात्कार केल्यानंतर वासनांधाला मारण्याचा महिलांचा निर्णय
पोलिसांनी सांगितले की, ज्या पुरुषाची हत्या करण्यात आली, तो बर्याच काळापासून महिलांचे लैंगिक शोषण करत होता. ३ जून या दिवशी त्याने ५२ वर्षीय विधवेवर बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर महिलांनी बैठक घेऊन आरोपीला मारण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी सांगितले होते की, या सर्व महिला आरोपीच्या घरी गेल्या. त्या वेळी तो झोपला होता. त्यानंतर महिलांनी आरोपीवर कुर्हाडीने वार करून त्याची हत्या केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात नेऊन जाळला.
संपादकीय भूमिकाभारतात बलात्कार्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा मिळत नसल्यामुळेच अनेक ठिकाणी जमावाकडून कायदा हातात घेऊन बलात्कार्यांना ठार मारण्याचे प्रकार वाढत आहेत ! याची नोंद घेऊन सरकार बलात्कार्यांच्या विरोधात जलद गतीने खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी पावले उचलणार का ? |
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक