‘ऑपरेशन सिंदूर’वरून पाकची अजित डोवाल यांच्यावर टीका

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारतीय सैन्याने पाकमधील ९ आतंकवादी ठिकाणे अचूकपणे उद्ध्वस्त केली. विशेष म्हणजे या संघर्षात भारताची कुठलीही हानी झाली नाही. इतकेच नव्हे, तर भारतात एक काचेचा तुकडाही फुटलेला नाही, या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलेल्या विधानावर पाकने टीका करत ‘डोवाल यांनी खोटेपणा केला असून चुकीची माहिती पसरवली आहे’, असा आरोप केला.
Pakistan criticises NSA Ajit Doval; accuses him of spreading false information
Doval said Indian forces destroyed 9 terror camps in Pakistan with pinpoint precision — “not even a piece of glass was broken in India.”
Pak FM calls it an attempt to mislead the public. pic.twitter.com/inxtLmO4xZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 12, 2025
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी सांगितले की, डोवाल यांचे वक्तव्य जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. ही एका उत्तरदायी देशाने आंतरराष्ट्रीय नियमांची केलेली पायमल्ली आहे. डोवाल यांचे वक्तव्य राजनैतिक वर्तनाच्या निकषांचेही उल्लंघन करते. भारताने अशा सैनिकी कारवाईचे केलेले गौरवगान संयुक्त राष्ट्रांच्या सनदांचे गंभीर उल्लंघन आहे. भारताने ज्या ठिकाणांना लक्ष्य केले, ती ठिकाणे सामान्य नागरिकांची वस्ती असलेली क्षेत्रे होती आणि त्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. भारताच्या या आक्रमक भूमिकेकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. शाश्वत शांततेचा मार्ग संवाद, परस्पर आदर आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन, यांमध्येच आहे.
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !