पत्रकाराने पुराव्यासह उघडे पाडल्यानंतरही हिना यांच्याकडून सत्य स्वीकारण्यास नकार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकमधील आतंकवादी तळांवर केलेल्या आक्रमणात अनेक आतंकवादी ठार झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पाकचे सैन्य आणि पोलीस अधिकारी यांच्यासह आतंकवादी अब्दुल रौफ उपस्थित होता आणि याची छायाचित्रे प्रसारित झाली होती. या संदर्भात ‘अल् जझीरा’ या वृत्तवाहिनीने पाकच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांची मुलाखत घेतली. या मुलाखातीत रब्बानी यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी ‘मी पूर्ण आत्मविश्वासाने आणि पुराव्यांसह म्हणत आहे की, ही ती व्यक्ती नाही, जिला भारत आतंकवादी म्हणत आहे. ती सामान्य नागरिक आहे. पाकमध्ये लाखो अब्दुल रौफ आहेत.’ यावर पत्रकाराने तिचे म्हणणे किती खोटे आहे ?, हे उघड केल्यानंतरही तिने रौफ आतंकवादी असल्याचे मान्य करण्यास नकार दिला.
🎙️ Exposed on Live TV!
Ex-Pak FM Hina Rabbani Khar shamelessly defends a terrorist
even after being shown clear evidence! 😠🇵🇰🧨 Pakistan refuses to admit it's a terror hub fuelling anti-India activities.
👉 Time to isolate and crush the terror factory once and for all! 🔥… pic.twitter.com/bzqR1ewcc6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 11, 2025
१. पत्रकाराने सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पत्रकार परिषदेत पाकिस्तानी सैन्याने संबंधित छायाचित्र बनावट असल्याचे घोषित केले नाही. सैन्यदलाने सांगितले की, हा माणूस एका राजकीय पक्षाचा सदस्य आहे आणि सैन्य दलाने त्या माणसाचा राष्ट्र्रीय ओळखपत्र क्रमांक (आयडी क्रमांक) प्रसारित केला. हा क्रमांक अमेरिकेच्या आतंकवादी सूचीत असलेल्या हाफीज अब्दुल रौफ याच्या क्रमांकाशी जुळतो.
२. यावर खार यांनी पुन्हा दावा केला की, पाकिस्तानी सैन्याच्या संबंधित विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, ही तीच व्यक्ती नाही.
संपादकीय भूमिकापाक कधीही ‘त्याच्या देशात आतंकवादी आहेत आणि ते भारताच्या विरोधात कारवाया करतात’, हे स्वीकारणार नाही. त्यामुळे त्याला नष्ट करणेच आवश्यक आहे ! |
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण