९० जणांनी ‘लिव्ह इन रिलेनशिप’साठी ( विवाह न करता पुरुष आणि स्त्री यांनी एकत्र रहाणे) केला अर्ज

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड राज्यात समान नागरी कायदा या वर्षाच्या २७ जानेवारीपासून लागू झाला. या कायद्यातंर्गत नागरिकांना विवाह, घटस्फोट आणि ‘लिव्ह इन रिलेनशिप’ यांच्या नोंदणीसाठी ६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी या २७ जुलै या दिवशी समाप्त होत आहे. त्यामुळे या संदर्भातील नोंदणीसाठी लोकांची एकच झुंबड उडाली आहे.
१. समान नागरी कायद्यामुळे २६ मार्च २०१० पासून ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीत झालेले विवाह, घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेनशिप यांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आली आहे. या कायद्याचा उद्देश ‘सर्व नागरिकांना समान अधिकार देण्याचे निश्चित करणे’, हा आहे. या कायद्याद्वारे लैंगिक समानता, बहुपत्नीत्व थांबवणे, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पारदर्शकता आणण, ही उद्दिष्टे आहेत.
२. आतापर्यंत २ लाखांहून अधिक विवाह आणि ९० लिव्ह इन रिलेशनशिप, यांसाठी अर्ज आले आहेत. त्यांची नोंद करण्यात आली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिप समोर आणण्याचे धाडस अल्प लोकांनी दाखवले आहे. या प्रकरणात सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावर १४ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे.
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
Maharashtra Uniform Civil Code : महाराष्ट्रात सिद्ध केले जाणार समान नागरी कायद्याचे प्रारूप ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
Barabanki Conversion Traps : बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानांकडून चालू आहे हिंदूंचे धर्मांतर !
सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रविष्ट ! – राजेंद्र शेळके, मंदिरे सिमती
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती !
Actor Prakash Raj : पुरोगामी अभिनेते प्रकाश राज यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट