
मुंबई, २३ जून (वार्ता.) – महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार समान नागरी कायद्याचा मसुदा बनवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालानंतर महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा निर्णय घेतला जाईल. समान नागरी कायद्यासाठी शासन सकारात्मक आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी २३ जून या दिवशी विधानसभेत दिली.
भाजपच्या आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी ‘राज्यात तिहेरी तलाकसारख्या अनिष्ट प्रथांवर कडक कारवाई करावी’, याविषयी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देतांना राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात सांगितले, ‘‘समान नागरी कायदा हा सर्व धर्मियांसाठी असेल. याद्वारे मुसलमान धर्मातील बहुपत्नीत्व प्रथेवरही निर्बंध येतील.’’
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !