मुसलमानांकडून स्वतःच्या ढाब्यांना हिंदु देवतांची नावे दिली जात असल्याचे प्रकरण

ऋषिकेश (उत्तराखंड) – जसा आपल्याला हिंदु असल्याचा अभिमान आहे, त्याचप्रमाणे सर्व मुसलमानांनाही त्यांच्या धर्माचा अभिमान असला पाहिजे. सर्व मुसलमानांचे पूर्वज हिंदु आहेत, त्यामुळे दुकानांची नावे पालटण्यात काही अर्थ नाही. दुकानांचे नाव हिंदु ठेवण्यात काही अर्थ नाही. नाव पालटणे व्यावहारिक आणि धार्मिकदृष्ट्या चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया योगऋषी रामदेवबाबा यांनी व्यक्त केली. कावड यात्रेच्या मार्गावर मुसलमानांच्या ढाब्यांना हिंदु देवतांची नावे दिली जात असल्याच्या घटनांवर ते बोलत होते.
रामदेवबाबा पुढे म्हणाले की,प्रत्येकाने स्वतःचे जे नाव आहे तेच ठेवावे. जर लोकांची इच्छा असेल, तर ते हॉटेलवर किंवा ढाब्यावर येऊन जेवण करतील.
हिंदूंनी वेगवेगळ्या भाषा आणि पंथ यांच्या आधारावर आपापसांत भांडू नये !
महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषांवरून चालू असलेल्या वादाविषयी रामदेवबाबा म्हणाले की, देशातील सर्व भाषांसमवेत मराठी भाषेचाही आदर केला पाहिजे. त्यामुळे हिंदूंनी वेगवेगळ्या भाषा आणि पंथ यांच्या आधारावर आपापसात भांडू नये. यामुळे सनातन धर्म आणि राष्ट्रीय एकता यांची हानी होते.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !