
नवी देहली – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग गेल्या १७ दिवसांपासून बेपत्ता आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे कुठेही सार्वजनिक वक्तव्यही दिसत नाही. त्यांची कुठे मुलाखतही प्रसिद्ध झालेली नाही. दुसरीकडे त्यांचे जवळचे अधिकारीसुद्धा बदलण्यात आले आहे. ६ आणि ७ जुलै या दिवशी ब्राझिल देशामध्ये होणार्या ‘ब्रिक्स’ देशांच्या बैठकीत ते सहभागी होणार नाहीत. गेल्या १२ वर्षांत प्रथमच ते या बैठकीत सहभागी होणार नाहीत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘चीन सम्राट यांचा शेवट होणार आहे’, अशी भविष्यवाणी केली होती. ती आता खरी होणार आहे कि काय ? चीनमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे का ?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
🇨🇳 Chinese President Xi Jinping Missing for 17 Days ‼️
🚫 No public appearances, speeches, or interviews
🔄 Close aides replaced
❌ Will skip upcoming BRICS summit
⚠️ Is a power shift underway in China? 👀#XiJinping #China #BRICS #Geopolitics
VC – @WIONews pic.twitter.com/wPlGODBJuc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 4, 2025
शी जिनपिंग ७ ते १० मे २०२५ या कालावधीत रशियाच्या दौर्यावर होते. त्यानंतर ते कुठेही दिसले नाहीत. त्यांचे कुठे वक्तव्य आले नाही. कुठे छायाचित्रही प्रसिद्ध झाले नाही. तसेच सामाजिक माध्यमांत त्यांची एकही पोस्ट दिसली नाही.
शी जिनपिंग आजारी असण्याची शक्यता
शी जिनपिंग यांना एखादा गंभीर आजार झालेला असू शकतो. काही दिवसांपूर्वी बेलारूसच्या राष्ट्रपतींच्या भेटीच्या वेळी त्यांची प्रकृती बरी नव्हती.
चीनमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता
चीनमध्ये ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ हा एकमेव पक्ष आहे. या पक्षाचा सरचिटणीसच राष्ट्रपती आणि सैन्य यांना नियंत्रित करणार्या आयोगाचे प्रमुख असतात. सध्या जिनपिंग यांच्याकडे राष्ट्रपतीसह ही दोन्ही पदे आहेत; परंतु सध्या सर्व मोठे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडून काढून घेतल्याचे सांगितले जात आहे. आता हा अधिकार ‘एजन्सी ऑफ डिसीजन मेकींग’ या नव्या समितीकडे गेला आहे. यामुळे शी जिनपिंग विरोधात राजकीय उलथापालथ चालू असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा