
भारतातील महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावाजलेल्या पवई येथील ‘आयआयटी मुंबई’मध्ये नुकतीच एकाने घुसखोरी केल्याची घटना उघड झाली होती. जवळजवळ १४ दिवस तेथे बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्या बिलाल अहमद फयाज अहमद तेली (वय २२ वर्षे) या मुसलमान तरुणाला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. तो ७ जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या कह्यात असणार आहे. त्याच्याकडे आतंकवादाशी संबंधित असे काही साहित्य किंवा कोणतेही गुन्हेगारी पुरावे आढळलेले नाहीत; पण तरी अशा शैक्षणिक संस्थेत एखादी व्यक्ती येऊन १४ दिवस राहून जाते आणि तिच्याविषयी कुणालाही थांगपत्ता लागत नाही, हे कसे काय ? याचा शोध अन्वेषण यंत्रणा घेतीलच; पण यातून उघड होते, ती भारतातील तकलादू अंतर्गत सुरक्षायंत्रणा ! जर बिलाल अहमद आयआयटी मुंबईचा विद्यार्थी नव्हता, तर त्याला तेथे प्रवेश मिळालाच कसा ? त्याच्याकडे तेथील ओळखपत्रही नव्हते, मग त्याला कुणी हटकले कसे नाही ? शिक्षकांनाही हा अनोळखी चेहरा लक्षात कसा आला नाही ? ‘पीएच्.डी.’चा विद्यार्थी असल्याचे भासवून फिरणार्या बिलालला कुणीही कसे हटकले नाही ? त्याने तेथील ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) संबंधित परिषदेलाही उपस्थिती दर्शवली होती. तेव्हाही कुणाचेच त्याच्याकडे लक्ष गेले नाही, हे सर्वच एकूण गंभीर आहे. तो तेथील वसतीगृहाच्या सामायिक खोलीत झोपत असे. तरीही कुणाला त्याचा मागमूस लागला नाही. त्याने परिसरात बरीचशी छायाचित्रे, तसेच व्हिडिओही काढले; पण ‘सर्वांच्याच दृष्टीतून तो सोयीस्कररित्या सुटला’, असेच म्हणावे लागेल. एकदा तो वर्गात बसलेला असतांना प्राध्यापकाने त्याच्याकडे ओळखपत्र मागितले, तेव्हा तो तेथून पळून गेला. त्यानंतर शोध घेऊन त्याला पकडण्यात आले. आयआयटी मुंबईसारख्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था अत्यंत चोख असतांना असा प्रकार घडणे लाजिरवाणेच आहे. एकूणच ही घटना म्हणजे सुरक्षाव्यवस्थेला एकप्रकारे पडलेले भगदाडच आहे. प्रतिष्ठित म्हणवल्या जाणार्या शैक्षणिक संस्थेत अशी चूक कशी होऊ शकते ?

अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी कठोर सुरक्षा धोरण लागू करायला हवे. सर्वच शैक्षणिक संस्थांच्या दृष्टीने या घटनेकडे गंभीरतेची चेतावणी म्हणून पहायला हवे. प्रत्येक विद्यार्थ्याचे ओळखपत्र पडताळले जाते का ? सीसीटीव्ही यंत्रणा परिणामकारक आहे का ? हेही पहायला हवे. या प्रकरणातील सुरक्षेत अक्षम्य निष्काळजीपणा करणार्यांवर कोणती कारवाई झाली ?, हे अद्याप समाजासमोर आलेले नाही. ते समोर आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा धाक निश्चित निर्माण होईल. एखाद्याचे अनियमित वर्तन ओळखणारी प्रणाली अस्तित्वात असायला हवी. सुरक्षारक्षकांना सायबर प्रशिक्षण द्यायला हवे, तसेच विद्यार्थी आणि शिक्षक यांनी अनोळखी व्यक्तींविषयी तात्काळ मत नोंदवण्यासाठी त्यांच्यात जनजागृती करायला हवी. बनावट ई-मेल तातडीने पडताळून घ्यायला हवेत. हे सर्व उपाय योजल्यासच शिक्षण संस्थांची प्रतिमा अबाधित राहू शकते. त्यातूनच देशाची सामाजिक आणि आर्थिक गणिते सांभाळली जाऊ शकतात.

सजगता, सतर्कता आणि सुरक्षितता !
मुंबईतील वरील घटना केवळ प्रातिनिधिक आहे; परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला, तर येथे अनेक औद्योगिक, आर्थिक आणि प्रशासकीय केंद्रे आहेत. त्यात मोठमोठ्या आस्थापनांचा समावेश आहे. अशा ठिकाणी बिलालसारखा एखाद-दुसरा तरुण वावरत नसेल कशावरून ? त्यामुळे केवळ एकट्या मुंबईचा विचार करून चालणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात, तसेच देशभरातील सुरक्षेच्या दृष्टीने विचार करायला हवा. खरेतर ते प्रत्येकाचे दायित्व आणि कर्तव्य आहे. मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तेल शुद्धीकरण प्रकल्प, वीज निर्मिती केंद्रे, मुंबईतील प्रमुख रेल्वेस्थानके, मुंबई उच्च न्यायालय, मंत्रालय, गेटवे ऑफ इंडिया यांसह अन्य अनेक ठिकाणची सुरक्षाव्यवस्था चोख असायला हवी. सगळीकडेच घुसखोरी होईल, असे नाही; पण विविध प्रकारच्या आक्रमणांच्या माध्यमांतूनही या स्थळांना लक्ष्य केले जाऊ शकते. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकात सतर्कता असायला हवी.
‘हेरगिरी’ हे माध्यम तर आता नित्याचेच झाले आहे. अगदी ताजे उदाहरण द्यायचे म्हटले, तर पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मोहिमेची माहिती आधीच काही जणांपर्यंत पोचली होती. देशांतर्गत असणार्या हेरांनी किंवा शत्रूराष्ट्रांच्या गुप्तचर संस्थांपैकी काहींनी ही माहिती उघड करण्यात आल्याचे भारतीय सुरक्षायंत्रणांनी सांगितले. भारताच्या संरक्षण दलाने ही मोहीम सर्वथा यशस्वी केली; पण हेरगिरी प्रकरणामुळे ही मोहीम अयशस्वी करण्याचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणात रचले गेले होते, याकडे दुर्लक्षून चालणार नाही; कारण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’प्रमाणे अनेक गुप्त कारवाया आजही केल्या जातात किंवा अनेक घडामोडी घडत असतात. त्यांची माहिती उघड करणे किंवा तत्सम प्रणाली बिघडवण्याचा प्रयत्न होणे यातूनही हेरगिरी केली जाते. याचा सर्वस्वी परिणाम भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेवर होतो. ती प्रतिमा डागाळण्यासाठी देशविरोधी गट टपलेलेच आहेत. त्यामुळे हेरगिरीविरोधी पथके अधिक सक्रीय करायला हवीत. एखाद्या गुप्त मोहिमेची माहिती किती प्रमाणात उघड करायची, याचीही दक्षता बाळगायला हवी.

‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून मोहात पाडून किंवा आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. या ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात आजवर अनेक उच्चपदस्थ अधिकार्यांची फसवणूक केली जाऊन त्यांना अडकवण्यात आले आहे. ‘डी.आर्.डी.ओ.’, म्हणजेच ‘संरक्षण संशोधन आणि विकास संघटने’च्या संदर्भातील माहितीही उघड केली जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातील हेरांचा सहभाग असतो. अशा महत्त्वपूर्ण संस्थेची माहिती उघड होणे, याचा अर्थ केवळ संस्थेलाच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या सुरक्षायंत्रणेसाठीच हे धोकादायक आहे.
थोडक्यात काय, तर प्रत्येकच भारतियाने सजग आणि सतर्क राहून देशविराेधी शक्तींना प्रत्युत्तर देत रहायला हवे. असा भारतीयच खर्या अर्थाने सुरक्षित राहू शकतो आणि देशाला सुरक्षित वातावरण मिळवून देऊ शकतो. यासाठी त्याच्यामध्ये कर्तव्यनिष्ठा आणि देशप्रेम असणे आवश्यक आहे. ते असल्यासच सुरक्षेची जाण त्याच्यात निर्माण होऊ शकते. ही जाण असणारा भारतीय म्हणजेच भारताचा भविष्यातील सुरक्षिततेचा पाया आहे. ‘बिलाल’ने १४ दिवस बेकायदेशीररित्या राहून भारतियांचे बंद असलेले डोळे उघडले आहेत’, असे म्हणता येईल ! आता केवळ डोळे उघडे ठेवून चालणार नाही, तर ती दृष्टी भेदक असायला हवी. त्यातूनच देशविरोधकांना, तसेच शत्रूंना वेळीच हेरून त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी तत्परतेने पावले उचलून भारताला खर्या अर्थाने सुरक्षित करूया !
संपादकीय भूमिका‘ऑपरेशन सिंदूर’ची गुप्त माहिती उघड होणे, हे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा डागाळण्याचे रचलेले षड्यंत्रच होय ! |
संपादकीय : तथाकथित झुरळांचा उच्छाद !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !