|

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशात कावड यात्रेला प्रारंभ झाला आहे. उपहागरगृह आणि ढाबे यांच्या मालकांनी त्यांची ओळख दर्शनी भागात लावण्याचा आदेश राज्य सरकारने गेल्या वर्षीच दिलेला आहे. तरीही काही ठिकाणी मुसलमानांकडून ही माहिती लावण्याचे टाळून उपहारगृह किंवा ढाबा यांना हिंदु नावे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे येथील बाघरा आश्रमाचे स्वामी यशवीर महाराज यांनी कावड यात्रेच्या मार्गावरील उपहारगृहे आणि ढाबे यांच्या तपासणीसाठी त्यांच्या अनुयायांना आदेश दिला. त्यांनी तपासणी चालू केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे, तसेच यशवीर महाराजांना पोलिसांनी नोटीस पाठवून याविषयी पुढील ३ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
आमची मोहीम चालूच रहाणार ! – यशवीर महाराजांची घोषणा
यशवीर महाराज यांनी नोटीस मिळाल्यानंतरही चेतावणी देतांना म्हटले की, हिंदू नावाखाली हॉटेल आणि ढाबा चालवण्याचे मुसलमानांचे षड्यंत्र कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. काही ठिकाणी मुसलमान लोक हिंदूंच्या देवतांच्या नावाने ढाबा आणि हॉटेल्स उघडत आहेत, ज्यामुळे सामान्य हिंदु समाजाची दिशाभूल होत आहे. विरोध केल्यानंतर पोलिसांनी ६ हिंदु तरुणांना नोटीस पाठवल्या आहेत; परंतु खोट्या तक्रारी आणि धमक्या यांमुळे आंदोलन थांबणार नाही. ही चळवळ अधिक जोमाने चालू राहील आणि जिथे जिथे अशी हॉटेल्स चालू आहेत, तिथे तिथे कारवाई केली जाईल.
काय आहे प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी कावड यात्रेच्या मार्गावरील दुकानांच्या नावाच्या पाट्यांच्या प्रकरणी यशवीर महाराज आणि इतर हिंदु संघटनांचे कार्यकर्ते राठेडी चौकात असलेल्या वैष्णो शुद्ध ढाब्यावर गेले. त्यांनी ढाब्यावर असलेल्या कर्मचार्यांकडून ढाब्याच्या मालकाची चौकशी केली. त्यांनी सांगितले की, ढाबा चालकाचे नाव सनवर आहे. यशवीर महाराजांनी ढाब्याचे नाव पालटण्यास सांगितले होते. या वेळी एका कर्मचार्याचे नाव विचारत त्याचे कपडे काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमात प्रसारित झाला. या प्रकरणी कपडे काढण्याचा प्रयत्न करणार्यांना न्यू मंडी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यांना ३ दिवसांत त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती